स्मृतीबनातून-स्वप्न(पद्य)

'जे न देखे रवी ते देखे कवी' ही उक्ती तर सर्वश्रुत आहे. याच धर्तीवर 'जे न घडे प्रत्यक्षात कवी पाहतो स्वप्नात''…

स्वप्न


कधी वाटते ऐसे घडावे
मला प्रेमभावे तूही पहावे

होईल अपुली भेट जेव्हा

हरपावे जगाचे भान तेव्हा


चांदणे रात्रीत पिऊन घ्यावे

मिठीतुन सूर्यास अर्घ्य द्यावे


घडेल हे तेव्हा घडावे

तोवरी किमान स्वप्नी रमावे


नितीन सप्रे

नवी दिल्ली

nitinnsapre@gmail.com

(2306232035)

टिप्पण्या

  1. नितीन जी,
    सुप्रभात
    माझ्या मनात असा विचार आला ही कविता वाचल्यानंतर की स्वप्नरंजन नसतं तर हे माणसं अतिशय दुःखी झाली असती, जीवन नकोसं झालं असतं . जे प्रत्यक्षात मिळत नाही ते स्वप्नात मिळवण्याचा माणूस प्रयत्न करतो मग ती कोणतीही गोष्ट असो अगदी प्रेमापासून ते पैशापर्यंत।। तुमची कविता आवडली छान आहे ।

    उत्तर द्याहटवा
  2. सुदिन...आभारी आहे विजय जी...तुम्ही माझी प्रत्येक शब्दकारी नुसती सहनच करता असं नाही तर वर त्याची आवर्जून तारीफही करता. तुमच्या सहनशक्तीला सलाम!☺️🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक