स्मृतीबनातून-छाया(पद्य)
जगातल्या सर्वाधिक उंच, सर्वात मोठया खऱ्या पाण्याच्या नितांत रमणीय 'पॅगोंग लेक'च्या तीरावर उभा झालो, तोच छाया तळ्यात उतरली...
छाया
आरस्पानी महानीळ तळे पाहुनी
सावळ छाया गेली मोहुनी
क्षणात उतरली तळ्यात तीही
सचैल सुस्नात होऊनी गेली
तीच्यावरी तो रविराज भाळला
छाये संगे खेळ मांडला
क्रोधित होऊनी मेघ धावला
सूर्या पुढती उभा ठाकला
रवि मेघाच्या कलहात बावरी
कोमेजून मग छाया गेली
व्यर्थ तयांनी चुरस केली
तळ्यातच ती विलीन झाली
नितीन सप्रे
पॅगोंग लेक, लडाख
(0207231643)
सुंदर !
उत्तर द्याहटवावाहवा नितीनजी
उत्तर द्याहटवाखूप सुंदर