स्मृतीबनातून - आपुले(पद्य)

 आपुले

अनुभवली आहे बरीच आपुल्यांची मी आपुलकी

गरजे नुसार प्रत्येकवेळी ती वाढली खालावली


कित्येक वेळा त्यांनी मला मानले परमेश्वरी 

वरदान मिळता निघाले थांबले ना क्षणभरी


देऊनी हातात हात पाहती स्वप्ने भरजरी

पूर्तता होताच त्यांची सुरू पुन्हा कुरबुरी


मुष्किली सांगता आपुल्यांना होतात काही कमी

अन् सांगतो काही होतात आपुलेही कमी


ठेविले त्यांच्या सुखाला सर्वदा सर्वोपरी

एकदाही जीव नाही ओवाळला माझ्यावरी


नितीन सप्रे

250323

टिप्पण्या

  1. आपण काळाचा महिमा असं नेहमी म्हणतो मला वाटते कली युगात असे घडणे स्वाभाविक आहे कारण कलियुगात असेच उफारटे घडणे अपेक्षित आहे।
    पद्य तेच तेच तर सुंदर रीतीने सांगत आहे
    नितीन जी सुरेख

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक