स्मृतीबनातून-असे का वाटते?

असे का वाटते?

न जाणे तुला पाहिल्यावर

डोळी साठवावे असे का वाटते?  

हातात हात तुझा घेतल्यावर

रहावा करी असे का वाटते?


तुझे मृदुल गूज श्रवणताना

ऐकतो कूजन असे का वाटते?

तुझी नेत्र पल्लवी निरखताना

ढळती चामरे असे का वाटते?


तुझे मंद स्मित न्याहाळताना

स्मितात हरपावे असे का वाटते?

तुला पाहूनी डौलात चालताना

मागावर असावे असे का वाटते?


तुझे गीत गात असताना

साकारावे तू असे का वाटते?

तुझी चित्र रेषा रेखाटताना

आकारावे तू असे का वाटते?


तुझी संकल्पना अशी करताना

कल्पनेत रमावे असे का वाटते?

प्रत्यक्षात तू मला भेटताना

कल्पनेतली असावी असे का वाटते?



नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

नवी दिल्ली

(1607231245)

टिप्पण्या

  1. नितीन जी
    असे का वाटते? हे नक्कीच सांगता येणार नाही पण तुमची कविता तुमचे लिखाण हे वारंवार का वाचावे वाटते हे मात्र नक्की सांगता येईल कारण ते मनास भिडते ,ते काहीतरी सांगून जाते .
    छान रचना.

    उत्तर द्याहटवा
  2. नक्कीच असे वाटते, सुंदर व्यक्त केले आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक