स्मृतीबनातून-विकल मन(पद्य)
मन:स्थितीच्या विपरीत परिस्थिती हा तसा सार्वत्रिक अनुभव म्हणता येईल. संवेदनशील मनांना मात्र हा अधिक बोचरा वाटतो. असहाय्य वाटतो.
विकल मन
पाऊस रुपेरी चांदण्यांचा बरसला जेव्हा मनात
निष्पर्ण कोरडे झाड होते तिथे वनात
फेसाळ शुभ्र लाटा उसळल्या त्या अंतरात
सोबतीस कुणी हाय नव्हते भिजण्यास सागरात
स्वर गोड पावरीचे दाटले हे उरात
भाव मुग्ध राधा नव्हती त्या सुरात
तारा अश्या तन तंबुरीच्या झंकारल्या स्वरात
स्वरशब्द हरपले होते गाऊ कसे स्वगीत
हुरहुर त्या मारव्याचा स्वर दाटला कंठात
लोचनी तरळले अश्रू ओघळले रित्या ओंजळीत
रज कण अस्तित्वाचे विखुरले विकल स्वरात
वारस कुणीही नव्हता करण्यास ते प्रवाहित
नवी दिल्ली
मार्च 2023
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा