स्मृतीबनातून-मधुमरंद(पद्य)

 मधुमरंद


कानात वाजती जेव्हा मधुमंद सुरेल गाणी

निमिषात जाणतो ही असे कुणाची वाणी


तरळती मनात आठव जणू चांदण्यांचे पुंज

ठेवावे जपून कैसे प्राजक्त फुलांचे कुंज


मानावी चूक कैसी होणे सुवास धुंद

स्वये होऊनी बंदी अलि प्राशितो मरंद


नितीन सप्रे

250323





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक