स्मृतीबनातून-मधुप्रयाग(पद्य)


मधुप्रयाग


गुंतलो मी तिच्या कुंतल जाळ्यात ऐसा

वाटले भेदू नये हा चक्रव्यूह आता


बुडालो खोल काजळी मीन नेत्रात जेव्हा

नकोच या बुडत्याला काडीचा आधार तेव्हा


गूज अधर अधरांना जसे सांगते झाले

फुटू नये शब्द आता वाटून गेले


विरघळूनी गेलो असा कांचनी त्या बाहुपाशी

गगनी निस्तेज होऊनी गेल्या चमकत्या नक्षत्रराशी


नितीन सप्रे

नवी दिल्ली

nitinnsapre@gmail.com 

(0807230945)

                                       

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक