स्मृतीबनातून-वशिला(पद्य)

बहुसंख्य मानव तथाकथित सात्विक जीवन आचरून, पाप-पुण्याचं अनावश्यक स्तोम माजवून, उपास-तापास, व्रत-वैकल्य करून, त्या सर्व शक्तिशाली नियंत्या कडे बहुतेकदा अशाश्वत लौकिक गोष्टींसाठी वशिला लावतो तेव्हा परमेश्वर माणसाच्या बुद्धीची कीव करत असावा… 


वशिला



याचना आयुष्याची ही करतो कशाला?

जगण्यासाठी का उगा लावतो वशिला?


जन्मतः चुकीच्या कल्पनांचा जन्म झाला

गोंजारून घेण्यातच शैशवी काळ गेला


ज्याच्यावरी निस्सीम होते प्रेम केले

यौवनाने त्या विषय मोहजाली गुंतविले


अटळ आहे जर जरा ही

का मिरवू नये तिला ही?


अन् अखेरी जीवन व्रताच्या सांगतेला 

आळवू का नये कैवल्य भैरविला?


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

नवी दिल्ली

(1907231025)

टिप्पण्या

  1. नितीनजी,
    परमेश्वराने मानवाची कीव करणं सोडून दिलेल असाव कारण कितीही नाही म्हटलं तरी संतांप्रमाणे देवाशी सलगी करण्याचा प्रयत्न माणूस त्याच्या स्वार्थापायी करत असतो पण देव सर्व उपरी आहे त्यामुळे त्याला निश्चितपणे कळत की खरा भक्त कोण आहे ?पाखंडी कोण आहे? कोण दिखावा करतो त्यामुळे देवाकडे फारसा वशिला चालत नसावा असं मला वाटतं ते काम पृथ्वीतलावर माणसं आपापलं काम करून घेण्यासाठी करत असतात. असो जग आहे तोपर्यंत वशीला चालत राहणार .काव्य मात्र फार सुरेख नेमकं मर्मावर बोट ठेवणार ।धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक