स्मृतीबनातून-चांदणी(पद्य)

चांदणी



सुदूर सान चांदणी

चमकली गगनात ती

प्रसन्न फाकल्या प्रभेत

टिपूर चांदणे मनात


होईल का कधीतरी

उतरेल ती धरेवरी

ठबकेल मग दवापरी

मनीच्या सानिया फुलांवरी


स्वप्नीच स्वप्न रंगली 

तारका दारात पातली

चांदणं रुपेरी भवताली

गात्रे त्यात न्हाईली


फुलपंखी नजर धानी 

फिरली तना मनातूनी

झिरपल्या त्या अमृतानी

फुलला श्रावण रंध्रातूनी


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

3108232330




 

टिप्पण्या

  1. नितीन जी
    निळ्या नभाच्या पार्श्वभूमीवर लखलखणाऱ्या चांदण्या मन विभोर करतात। मन आनंदी होऊन जातं. चांदण्या शब्द होऊन दारात उतरतात तुमच्या कवितेतली चांदणीआवडली. छान आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक