स्मृतीबनातून-किराणा 'प्रभा'वळीत बहरलेला मोगरा
किराणा 'प्रभा'वळीत बहरलेला मोगरा
उपोद्घात
सततच्या आजारपणानं शिक्षकी पेशातल्या इंदिराबाईंना ग्रासलं होतं. काहीसा दिलासा मिळावा म्हणून कुणीतरी बाईंना संवादिनी(पेटी) शिकण्याचा संगीतोपचार सुचवला. त्यांनी तो अंमलात ही आणला पण जीव फार काळ रमु शकला नाही. लवकरच तो बंद पडला. आता नुकत्याच नेमलेल्या गायन मास्तरांची शिकवणी इतक्या लगेच बंद कशी करायची? म्हणून स्वतःही शिक्षक असलेल्या आबासाहेबांनी पत्नी ऐवजी आठ वर्ष वयाच्या आपल्या कन्येला शिकवणी द्यायला त्यांना सांगितलं. तसं बघता ही एक अतीसामान्य घटना पण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वासाठी हा सुवर्णकांचन योग ठरला. कारण या घटनेमुळे, पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय घरात, पूर्वापार चालत न आलेला संगीताचा संस्कार असा काही रुजला, बहरला, डवरला की त्याच्या वर्णनासाठी थेट माऊलींच्या शब्दांनाच शरण जावं लागेल…"इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलु गेला गगनावेरी"(गगना पर्यंत) मोगरा फुलला...मोगरा फुलला...पांढऱ्या शुभ्र दळदार मोगाऱ्याच्या फुलांचा सुगंध ज्याप्रमाणे आसमंत सुवासिक, पवित्र करून टाकतो तद्वतच भविष्यात या छोट्या मुलीच्या प्रभेनं संगीताचं अवघं अवकाश उजळून निघालं. ती वयानी आणि अधिकारानीही जसजशी मोठी होत गेली तसतशी तिनं आपल्या चतुरस्र प्रतिभेच्या प्रसन्न प्रभेनी शास्त्रीयगान अवकाश आलोकित करून किराणा घराण्याच्या प्रभावळीत डॉक्टर प्रभा अत्रे म्हणून आपलं सात्विक अढळ स्थान निर्माण केलं.
जडण घडण
नदीचं उगमस्थान लहानश्या झऱ्याच्या रूपात असतं मात्र पुढे ती जशी विस्तीर्ण पात्रात बदलते तसच काहीसं प्रभाताईंच्या संगीत सरीते बद्दल म्हणता येईल. त्यांच्या घरात कधी कुणी शास्त्रीय संगीताचं, गायन तर सोडाच, श्रवणही केलं नव्हतं. त्यामुळे प्रभा आणि त्यांची बहीण उषा या दोघींच्याही डोक्यात हल्ली सारखा या क्षेत्रात करिअर वगैरे करण्याचा साधा विचारही कधी डोकावला नव्हता.
मात्र विज्ञानशास्त्र आणि विधी शाखेच्या विद्यार्थिनी असलेल्या प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी रुजलेल्या संगीतबीजा मुळे, स्वरशास्त्रात आणि संगीताच्या कायद्यात अधिक रममाण झाल्या. विजय करंदीकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीत विधिवत शिकायला सुरुवात केली. पुढे गुरू-शिष्य परंपरे नुसार किराणा घराण्याचे गायक सुरेशबाबू माने आणि त्यांच्या भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं. नमनाला घडाभर तेल या उक्ती प्रमाणे, सुरेश बाबुंकडे नमनालाच वर्षभर यमन गिरवून झाल्या नंतर जेव्हा प्रभाताईंनी त्यांना विचारलं की "आणखी किती दिवस यमन शिकायचा?" तेव्हा सुरेशबाबुंनी त्यांना प्रतिप्रश्न केला. "तुला यमन येतो?" आणि वर्षभर नियमानं यमनाचा रियाज करूनही या प्रश्नाला त्या होकारार्थी उत्तर देऊ शकल्या नाहीत. या प्रश्नानी निरुत्तरीत होण्यातंच प्रभाताईंच्या सांगितिक जीवनाच्या यशस्वीतेच मर्म दडलं असावं.
सरगम सुखोत्सव
मुलीनं डॉक्टर व्हावं अशी आई वडिलांची इच्छा होती. संगीतातल्या सरगमवर शोध प्रबंध लिहून, डॉक्टरेट मिळवून एका वेगळ्या अर्थानं प्रभाताईंनी ती पूर्ण केली. सरगम हा तसाही प्रभाताईंचा विक पॉइंट आणि त्यांनी गायलेली सरगम हा आपणा सारख्या श्रोत्यांचा. सरगम म्हणजे निव्वळ आराखडा असतो. त्याने भाव विलोप होतो अश्या प्रकारची टीका काही वेळा, काहीजणां कडून होत असते. मात्र अशा असुरी विचारांनी जराही विचलित न होता, ज्यांना सरगम म्हणता येत नाही ते टीका करतात असं स्पष्ट आणि ठाम मत, कुठलाही अभिनिवेश न बाळगता एका सुसंवादा दरम्यान प्रभाताईंनी सौम्यपणे व्यक्त केलं होतं. सरगम ही सौंदर्यपूर्ण सादरीकरण पद्धत असल्याचं सांगत, स्वतःच्या गायकीनं त्यांनी ते सप्रमाण सिद्धही केलं. एखाद्या नाजूक फुलपाखरानं जसं हळुवारपणे विविध फुलांवर विचरण करीत मधुपान करावं तशी मधुर स्वरांची लयबद्ध पखरण सरगमच्या स्वरूपात प्रभाताईंच्या कंठातून होत असे. रसिक श्रोत्यांसाठी ती भुळीतील भूल अशी एक सप्तरंगी भुलावण ठरत असे. त्यांच्या त्या सुरेल, मधुर सरगमच्या सुखोत्सवात जीव अनावर होईल अशी मोहिनी दडली होती.
लालित्यपूर्ण शास्त्रीयसंगीत
शास्त्रीय संगीताचा अजिबात गंध नसलेल्या माझ्या सारख्या अ'सूरा'चा, सुरांच्या अलौकिक विश्वाशी परिचय करून देऊन शास्त्रीय संगीताशी स्नेहबंध जुळण्याची किमया त्यांच्या गायनात होती. एचएमव्ही कंपनीनं काढलेल्या प्रभा ताईंच्या (Marubihag), कलावती(Kalawati) रागांच्या पहिल्याच लाँग प्ले ध्वनिमुद्रिकेच्या पारायणातूनच संगीताच्या या रूपाशी प्रीती जडली आणि त्यातूनच अगदी तानसेन जरी नाही तरी कानसेन घडवण्याची बहुमोल कामगिरी सहजीच घडली.
किराणा 'प्रभा'वळीत बहरलेला मोगरा उपोद्घात सततच्या आजारपणानं शिक्षकी पेशातल्या इंदिराबाईंना ग्रासलं होतं. काहीसा दिलासा मिळावा म्हणून कुणीतरी बाईंना संवादिनी(पेटी) शिकण्याचा संगीतोपचार सुचवला. त्यांनी तो अंमलात ही आणला पण जीव फार काळ रमु शकला नाही. लवकरच तो बंद पडला. आता नुकत्याच नेमलेल्या गायन मास्तरांची शिकवणी इतक्या लगेच बंद कशी करायची? म्हणून स्वतःही शिक्षक असलेल्या आबासाहेबांनी पत्नी ऐवजी आठ वर्ष वयाच्या आपल्या कन्येला शिकवणी द्यायला त्यांना सांगितलं. तसं बघता ही एक अतीसामान्य घटना पण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वासाठी हा सुवर्णकांचन योग ठरला. कारण या घटनेमुळे, पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय घरात, पूर्वापार चालत न आलेला संगीताचा संस्कार असा काही रुजला, बहरला, डवरला की त्याच्या वर्णनासाठी थेट माऊलींच्या शब्दांनाच शरण जावं लागेल…"इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलु गेला गगनावेरी"(गगना पर्यंत) मोगरा फुलला...मोगरा फुलला...पांढऱ्या शुभ्र दळदार मोगाऱ्याच्या फुलांचा सुगंध ज्याप्रमाणे आसमंत सुवासिक, पवित्र करून टाकतो तद्वतच भविष्यात या छोट्या मुलीच्या प्रभेनं संगीताचं अवघं अवकाश उजळून निघालं. ती वयानी आणि अधिकारानीही जसजशी मोठी होत गेली तसतशी तिनं आपल्या चतुरस्र प्रतिभेच्या प्रसन्न प्रभेनी शास्त्रीयगान अवकाश आलोकित करून किराणा घराण्याच्या प्रभावळीत डॉक्टर प्रभा अत्रे म्हणून आपलं सात्विक अढळ स्थान निर्माण केलं. जडण घडण नदीचं उगमस्थान लहानश्या झऱ्याच्या रूपात असतं मात्र पुढे ती जशी विस्तीर्ण पात्रात बदलते तसच काहीसं प्रभाताईंच्या संगीत सरीते बद्दल म्हणता येईल. त्यांच्या घरात कधी कुणी शास्त्रीय संगीताचं, गायन तर सोडाच, श्रवणही केलं नव्हतं. त्यामुळे प्रभा आणि त्यांची बहीण उषा या दोघींच्याही डोक्यात हल्ली सारखा या क्षेत्रात करिअर वगैरे करण्याचा साधा विचारही कधी डोकावला नव्हता.
मात्र विज्ञानशास्त्र आणि विधी शाखेच्या विद्यार्थिनी असलेल्या प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी रुजलेल्या संगीतबीजा मुळे, स्वरशास्त्रात आणि संगीताच्या कायद्यात अधिक रममाण झाल्या. विजय करंदीकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीत विधिवत शिकायला सुरुवात केली. पुढे गुरू-शिष्य परंपरे नुसार किराणा घराण्याचे गायक सुरेशबाबू माने आणि त्यांच्या भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं. नमनाला घडाभर तेल या उक्ती प्रमाणे, सुरेश बाबुंकडे नमनालाच वर्षभर यमन गिरवून झाल्या नंतर जेव्हा प्रभाताईंनी त्यांना विचारलं की "आणखी किती दिवस यमन शिकायचा?" तेव्हा सुरेशबाबुंनी त्यांना प्रतिप्रश्न केला. "तुला यमन येतो?" आणि वर्षभर नियमानं यमनाचा रियाज करूनही या प्रश्नाला त्या होकारार्थी उत्तर देऊ शकल्या नाहीत. या प्रश्नानी निरुत्तरीत होण्यातंच प्रभाताईंच्या सांगितिक जीवनाच्या यशस्वीतेच मर्म दडलं असावं. सरगम सुखोत्सव मुलीनं डॉक्टर व्हावं अशी आई वडिलांची इच्छा होती. संगीतातल्या सरगमवर शोध प्रबंध लिहून, डॉक्टरेट मिळवून एका वेगळ्या अर्थानं प्रभाताईंनी ती पूर्ण केली. सरगम हा तसाही प्रभाताईंचा विक पॉइंट आणि त्यांनी गायलेली सरगम हा आपणा सारख्या श्रोत्यांचा. सरगम म्हणजे निव्वळ आराखडा असतो. त्याने भाव विलोप होतो अश्या प्रकारची टीका काही वेळा, काहीजणां कडून होत असते. मात्र अशा असुरी विचारांनी जराही विचलित न होता, ज्यांना सरगम म्हणता येत नाही ते टीका करतात असं स्पष्ट आणि ठाम मत, कुठलाही अभिनिवेश न बाळगता एका सुसंवादा दरम्यान प्रभाताईंनी सौम्यपणे व्यक्त केलं होतं. सरगम ही सौंदर्यपूर्ण सादरीकरण पद्धत असल्याचं सांगत, स्वतःच्या गायकीनं त्यांनी ते सप्रमाण सिद्धही केलं. एखाद्या नाजूक फुलपाखरानं जसं हळुवारपणे विविध फुलांवर विचरण करीत मधुपान करावं तशी मधुर स्वरांची लयबद्ध पखरण सरगमच्या स्वरूपात प्रभाताईंच्या कंठातून होत असे. रसिक श्रोत्यांसाठी ती भुळीतील भूल अशी एक सप्तरंगी भुलावण ठरत असे. त्यांच्या त्या सुरेल, मधुर सरगमच्या सुखोत्सवात जीव अनावर होईल अशी मोहिनी दडली होती. लालित्यपूर्ण शास्त्रीयसंगीत शास्त्रीय संगीताचा अजिबात गंध नसलेल्या माझ्या सारख्या अ'सूरा'चा, सुरांच्या अलौकिक विश्वाशी परिचय करून देऊन शास्त्रीय संगीताशी स्नेहबंध जुळण्याची किमया त्यांच्या गायनात होती. एचएमव्ही कंपनीनं काढलेल्या प्रभा ताईंच्या (Marubihag), कलावती(Kalawati) रागांच्या पहिल्याच लाँग प्ले ध्वनिमुद्रिकेच्या पारायणातूनच संगीताच्या या रूपाशी प्रीती जडली आणि त्यातूनच अगदी तानसेन जरी नाही तरी कानसेन घडवण्याची बहुमोल कामगिरी सहजीच घडली.
शास्त्रीय संगीतातील शास्त्राशी जरी अद्यापही फार जुळून आलं नसलं, तरी संगीताशी मात्र अधिक रसपूर्ण जवळीक साधली गेली. मला शास्त्रीय संगीतानुकुल करणाऱ्या प्रभाताईंची ही ध्वनीमुद्रिका विशेष गाजली. शास्त्रीय संगीताशी ओळख असलेल्या बहुतेक प्रत्येकाला ती माहीत आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. त्यांच्या पुढच्या ध्वनीमुद्रिका यायला मात्र बराच काळ गेला. कारण चांगला गायक हा चांगला व्यावसायिक असतोच असं नाही. "मी जरी चांगली गायिका असले तरी चांगली व्यावसायिक होऊ शकले नाही. त्यामुळे ज्या ज्या वेळी ध्वनिमुद्रिकां बाबत विचारणा होत असे त्या त्या वेळी अधिक रियाज करून गाऊ या भूमिकेतून चालढकल करत गेले. ही माझी फार मोठी चूक ठरली" अशी खंत प्रभाताईंनी प्रांजळपणे व्यक्त केली होती. त्यांच्या या पहिल्या ध्वनिमुद्रिकेतल्या ख्याल गायनावर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद अमीर खान यांचा प्रभाव जाणवतो. घराण्याचा आब मात्र दुराग्रह नाही प्रभाताई या किराणा घराण्याच्या दिग्गज गायिका असल्या तरी घराण्याचा दुराग्रही अभिमान त्यांनी मोडीत काढला. नवे विचार, प्रवाह यांचं खुलेपणानं स्वागत केलं. त्यामुळे काहीवेळा काहींनी त्यांना बंडखोर वगैरे विशेषणं चिकटवल्याचही वाचनात आलं. घराण्याची चौकट त्यांनी ओलांडली असेलही मात्र ती मोडली नाही. एखाद्या व्यक्तीला जसं व्यक्तिमत्व असतं तसं शब्दाला ही शब्दमत्व(?) असतं. त्यामुळे बंडखोर हे विशेषण त्यांच्या सारख्या सात्विक, सोज्वळ, मृदू गायिकेच्या बाबतीत वर्ज्य ठरतं. त्या ऐवजी क्रांतिकारी, सुधारक, पूनर्भाष्यकर्ती अशी शब्द योजना त्यांच्या बाबतीत अधिक चपखल ठरते. "घराण्याच्या उज्वल परंपरांचं जतन करत असतांनाच, त्याचा परीघ विस्तारण्यात चुक काय आहे? किंबहुना घराणं जिवंत ठेवण्यासाठी त्यात निरंतर नाविण्याची पखरण करून गायकी अधिक मोहक, सशक्त करणं ही प्रत्येक कलाकाराची जबाबदारीच आहे. संथ आलापी, स्वर माधुर्य, भावपूर्ण प्रस्तुती या किराणा घराण्याच्या विषेशांगांना जराही धक्का न लावता तार्किक आणि वैज्ञानिकतेची जोड दिल्यामुळे आपलं गाणं हे पठडीतलं राहिलं नाही" असं त्यांनी स्वतःच म्हटलं आहे. जो संगीत शिकतो त्याला सर्व कलांच थोडंफार तरी ज्ञान असलं पाहिजे हे त्यांचं मत त्यांनी स्वआचरणातून ठसवून दिलं. कलाप्रांतात स्वच्छंद विचरणं किराणा घराण्याच्या मुर्धन्य शास्त्रीय संगीत गायिका तर त्या होत्याच पण त्याचबरोबर त्यांनी कथक या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारचा ही पदांन्यास केलेला होता. भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर यांनी कोरियोग्राफ केलेल्या 'नृत्य प्रभा' या नृत्य कार्यक्रमासाठी हिंदी भाषेत संगीत रचनाही केली होती. मानापमान, सौभद्र, संशय कल्लोळ, विद्याहरण, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव आदी नाटकात भूमिका करून त्यांनी काही काळ मराठी संगीत रंगभूमी सुशोभित केली. ख्याल गायकी बरोबरच ठुमरी, दादरा, नाट्यगीत, भजन, गझल गायकीही लालित्यपूर्ण रीतीनं मोठ्या सिद्धतेनं कंठाळली. (साहित्यातले विविध प्रकार लेखक/लेखिका हाताळतो/हाताळते मग गायकीतले विविध प्रकार गायक/गायिका कंठाळतो/कंठाळते असं का म्हणू नये ?) त्यांच्या ठुमरी गायनावर बडे गुलाम अली खान यांची सुखद सावली आहे. उत्तर भारतात विशेषतः पंजाबी गायकीत अधिक प्रचलित असलेला टप्पा किराणा घराण्यात प्रथम प्रभा ताईंनीच आणला. त्याच बरोबर दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत असे बहुविध संगीत प्रकार त्या लालित्यपूर्ण गात असत. भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगभरात झालेल्या प्रसारात त्यांचा मोलाचा वाटा होता. प्रभाताई म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या प्रभावळीत बहरलेली बाळसेदार मोगऱ्याची जणू प्रसन्न वेली. गायक नायक त्यांची स्वरनिष्ठा आणि सर्जनशीलता वाखाणण्याजोगी, अनुसरणिय आहे. पूर्व कल्याण, दरबारी कौन्स, पटदीप-मल्हार, शिव काली, तिलंग-भैरव, रवि भैरव सारख्या मिश्र रागांची निर्मिती करून त्यांनी संगीत सरितेचं पात्र अधिक विस्तारलं. कला सादरीकरण हा गायकाचा प्रांत तर बंदिशी बांधण्याची कामगिरी ही नायकाची जबाबदारी मानली जाते. या निकषावर प्रभाताई या गायक नायक ठरतात. गायिका तर त्या आहेतच पण अनेक बंदिशींची ही त्यांनी रचना केली. सुस्वराली हा त्यांचा बंदिशींचा आणि अंतःस्वर हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. आणि म्हणूनच प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभाताईंना बहुआयामी लौकिक प्राप्त झाला. प्रभाताईंनी विज्ञान आणि विधी या दोन्ही शाखांच शिक्षण घेतलं असलं तरी बेडूक, झुरळं यांचं विच्छेदन करणं किंवा अशिलांसाठी युक्तीवाद करणं हे कदाचित त्यांच्या स्वभावधर्माशी सुसंगत झालं नसतं. म्हणून प्रथमतः त्यांनी आकाशवाणीवर निर्माती म्हणून काम सुरू केलं. तिथे त्यांनी कर्नाटक, पाश्चात्य, सुगम, चित्रपट असं सर्व प्रकारचं संगीत, कुठलाही उच्चनीच असा भेदभाव न बाळगता खुल्या कानांनी ऐकलं. तिथेच त्यांनी अमिर खाँ यांचं गाणं ही खूप ऐकलं आणि त्यांची वैचारिक बैठक आकारत गेली. तसच त्यांच्या ठुमरीवर बडे गुलाम अली खाँ, बेगम अख्तर, नूरजहाँ यांचा प्रभाव अत्यंत प्रांजळपणे मोठ्या मनानं त्या मान्य करत. संगीतकला कठीण आहे. "सुरांची साधना पाण्यावर ओढलेल्या रेषे सारखी, उमटत असताच मिटून जाणारी" ही त्यांच्याच कवितेची ओळ फारच समर्पक आहे. कला आणि शास्त्र यातील समतोल. प्रभाताईंच एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कलात्मकता आणि शास्त्रीयता या दोन्हीत त्यांनी साधलेला समतोल. एकीकडे घराण्याची शिस्त पाळली मात्र घराण्याचा पारंपरिक उंबरठा त्यांनी ओलांडला आणि शास्त्रीय संगीताची बैठक (base) अधोरेखित करत असतानाच सुगम संगीताला कधीही कमी लेखलं नाही. सुगम संगीत हे शब्द प्रधान आहे. शब्दांचे अर्थ आपण जाणतो. इथे सूर आपल्या पर्यंत पोहोचतात ते शब्दांच्या, शब्दार्थाच्या माध्यमातून. पण शास्त्रीय संगीतात जो पर्यंत राग, ताल, नियम हे जाणत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थानं त्याचा आनंद घेता येत नाही हा या दोन प्रकारात फरक आहे. सुगम संगीत हे ऐकायला जरी सुगम असलं तरी ते प्रभावी गाता येणं मात्र तितकंच अवघड आहे. त्यासाठी शास्त्रीय संगीतासाठी जेव्हढा अभ्यास, साधना करावी लागते तितकीच किंबहुना अधिक मेहनत घ्यावी लागते. शास्त्रीय संगीतातल्या बंदिशी म्हणजे खरं काव्य नव्हे. कारण तिथे शब्द हे संगीत सामग्रीच्या रूपात येतात पण सुगम संगीतात काव्य हे घरातल्या कर्त्या प्रमाणे असतं. त्यामुळे ते एका विशिष्ट दर्जाचं असणं अभिप्रेत आहे. त्या काव्यातले शब्द गेय असावे लागतात त्यात नादमयता असावी लागते. गुंजन असावं लागतं. सुगम संगीत हे रागदारी संगीत नव्हे. इथे राग दर्शन हे ध्येय नसतं. मात्र रचना रागावर आधारीत असू शकतात आणि त्यात अनेक रागांच्या छटा बेमालूमपणे मिसळल्या ही असतात. इथे गाण्याचा मुखडा, चाल, एकूण सौष्ठव हे आकर्षक असणं नितांत गरजेचं असतं. रचनेचा तोल आणि तालही सांभाळावा लागतो. रचनेच्या डौलानुसार ठेक्याचं वजन निश्चित करावं लागतं. अनेक चित्रपट गीतं, भावगीतं हे निकष पूर्ण करतात. कुणालाही गाता येतील अशी ती सोपी वाटतात. अनेक जण ती गुणगुणू शकतात. मात्र ऐकायला सोप्या वाटणाऱ्या ह्या रचना गायला तितक्या सुगम नसतात हे प्रभाताई फार मोकळेपणानं मांडतात. त्यांच्या स्वर वाक्यात जितकं नाद माधुर्य आहे तितकंच शब्द वाक्य, विचार यात प्रखर विद्वत्ता आणि ठामपणा जाणवतो. संगीत शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रातील ठशीव कामगिरी प्रख्यात गायिका म्हणून असलेल्या नावलौकिका प्रमाणेच संगीत शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रात ही त्यांनी भरीव योगदान दिलं. सामान्य रसिकाला ही संगीत समजावून सांगता यावं तसच आपली शैक्षणिक रुची ही पूर्ण करता यावी म्हणून आकाशवाणीतली नोकरी सोडली आणि त्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात (SNDT) रुजू झाल्या. सर्व प्रकारच्या संगीत अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल घडवून त्यांनी तिथल्या कार्याचा श्रीगणेशा केला. आपल्या काळातील एक महान गायक, नायक विचारवंत संगीतकार म्हणून त्यांना अढळ स्थान प्राप्त झालं आहे. प्रभाताई आता साकार स्वरूपात आपल्यात नसल्या तरी निरागस निराकार सूरस्वरुपी त्यांना आपण नित्य अनुभवू शकतो हा 'खयाल' मनाला मोठा दिलासा दायक ठरतो. नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com


.jpeg)
छान माहितीपूर्ण लेख .
उत्तर द्याहटवानितीनजी ,
उत्तर द्याहटवाडॉक्टर प्रभा अत्रे यांचं गाणं आकाशवाणीत नोकरीला लागल्यापासून ऐकत आलेलो आहे त्यांची मारुबिहाग रेकॉर्ड कितीतरी वेळेला रात्रीच्या कोणत्याही प्रहरात ऐकलेली आहे जागू मे सारी रैना .क्या बात है तुम्ही अतिशय सविस्तरपणे त्यांचा जीवन परिचय आणि त्यांचं गाणं याबद्दल लिहिलेलं आहे ते रसिकांना नक्कीच आवडेल असंच आहे मला खूपच आवडलं धन्यवाद