स्मृतीबनातून-क्षितिज परी(पद्य)
दूर क्षितिजावर नजर खिळली असताना अचानक आभाळ दाटून आले. चपले सह पाऊस सरींचे नर्तन सुरू झाले आणि मनातल्या विचारांना शब्द लाभले.
क्षितिज परी
दूर तिथे क्षितिजावरी
खुणावते कोणी तरी
गूढ त्या किनारी
वाटते जावे सत्वरी
जाणतो आहे तिथे
शोधतो जे मी इथे
ओंजळीत यावे कसे
कोमल दवबिंदू असे
ओढ जीवाला खरोखरी
जावे तिथे कसे परी
बाहेर पावसाळी सरी
आणि तडीता तांडव करी
मन वेडे हे जाणते
सागरी तृष्णा न भागते
ओढ परी कशी वाटते
मृगजळा मागे धावते
मन बुद्धीचा मेळ जमला
श्रेयस प्रेयस संघर्ष संपला
दूरच्या क्षितिज सावल्या
मनात हळुवार निमाल्या
नितीन सप्रे
160920230725
सुंदर कविता, अभिनंदन
उत्तर द्याहटवा