स्मृतीबनातून-स्वरूप(पद्य)

स्वरूप


दाटूनी आले धुके

जायचे पुढती कसे

मार्ग तोच दाखवेल

मनी विभ्रम का असे


वाटेत जे येई समोर

प्रसाद भावे तू स्वीकार

ऐहिकाचे तोडून धागे

भजनी त्याच्या रमावे


इथवर झाला प्रवास

नित्य स्मरूनी तयास

अर्पून सर्वस्व त्यास

लौकिकातूनी काढ पाय


आलास तू घेऊनी काय

जाणार तू घेऊनी काय

चिंता मग का उगाच

वाहील तोच सर्व भार


नव्हतास तू नसणार तू

नश्वर या देहात तू

चिरंजीव असणार तू

आत्म स्वरूपात तू


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

170920232045





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक