स्मृतीबनातून-आसक्त(पद्य)

आसक्त

क्षण एकेक चालला होता

स्वप्निच स्वप्न राहिले

मोगरा सर्वत्र फुलला होता

माळून घेणे राहिले


शेफाली सडा शिंपला होता

सुगंधित होणे राहिले

रोखणे काळ अशक्य होता

प्रीती फुलवणे राहिले


तारका प्रकाश पसरला होता

उजळून जाणे राहिले

भेटीत आगळा स्नेह होता

तेजाळणे देह राहिले


गराडा भोवती ना'त्यांचा' होता

सुहृदांना भेटणे राहिले

जगणे सदा विषयाक्त होता

अनासक्त होणे राहिले.


नितीन सप्रे

Nitinnsapre@gmail.com

0609230647


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक