स्मृतीबनातून - शूळ(पद्य)
शूळ
दाटुन श्वास येऊ लागले जवळी जाता तिच्या
स्वतः वर नाराज होऊ लागलो समजावताना तिला
आस स्वप्नांच्या पल्याड गेली भेटीची आता तिच्या
पडणार स्वप्ने ही कशी दिन रात जागताना
आक्रोश का हा इतका वाढला अंतरी सुजनांच्या
पाहिले त्यांचे होते चेहरे सदा खळखळून हसताना
घुसमट बहुतेकदा सज्जनांची पाहिली इथे जगताना
न जाणे कधी नाकी आला मोकळा श्वास त्यांच्याशूळ कधीचा ठसठसे अजूनही मनात त्यांच्या
थकून गेला धन्वंतरी उपाय जखमांवर करताना
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
081020230935
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा