स्मृतीबनातून - साठवण(पद्य)

 साठवण


डोळ्यात घालूनी डोळे पाहसी का सखे ग

प्रतिमा ती तुझीच दिसणार तुला तिथे ग


आसवांत सुखाच्या कधी तू चिंब भिजली

दुःखाश्रूत कधी तू विरघळून पार गेली


सांभाळू तुला कसे सतत या दोन नेत्री

काळजीत माझा डोळा न लागतो रात्री


डोळ्यात साठवाया दुसरे काहीच नाही

जाऊ नको कुठेही डोळी भरून राही


निकट राखण्यास वसविले डोळी तुला मी

समीप राहशील जरी मिटले डोळे अखेरी 


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

031020231230





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक