स्मृतीबनातून - कृष्ण वेणू(पद्य)
कृष्ण वेणू
एकेक सूर इथला सांगतो माझी कहाणी
कधी सौख्य गाणी कधी गातो विराणी
मी नित्य नेमाने गायले गीत स्नेहाचे
कळले कुणास नाही स्वर भाव अंतरीचे
जमलेत लोक जैसे गाणे गात गेलो
वेदनेच्या स्वरांना दडवित खास आलो
कैफात त्या यौवनाच्या विसरून देह भान
कधी गाऊन गेलो दमदार चक्री तान
आवेग तो निमाला होता दर्शन सर्वव्यापी
हृदयात सुरू झाली हळुवार संथ आलापी
या मैफिलीत आता गाऊन सर्व झाले
कानात गुंजु दे आता स्वर कृष्ण वेणूचे
नितीन सप्रे
1003241625

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा