स्मृतीबनातून - प्राजक्त श्रृंगार (पद्य)

प्राजक्त श्रृंगार



मनी बरसल्या रेशीम अमृतधारा

रिमझिम स्मृतींचा मयुरी पिसारा 

स्वप्नी चमकला असा शुक्रतारा

तुझ्या भेटीचा आभास सारा


कवेत आले चुकवून नजरा

स्वैर घुमली होऊन वारा

लज्जेत अवघा चूर चेहरा

हसला मला यमुनेचा किनारा


उजळला नभी चंद्रज्योती फुलोरा

धरेवरी प्राजक्त श्रृंगार सारा

फिरून एकवार छेडून तारा

आळविते स्वर अंतरी उमलणारा



नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

2103242110

नवी दिल्ली

टिप्पण्या

  1. कविता उत्तम आहे. श्री हृदयनाथ यांच्यापर्यंत ती पोहोचली तर किती सुंदर गीत तयार होईल .....

    उत्तर द्याहटवा
  2. माझ्या प्रतिक्रियेवर त्वरित नोंद घेऊन उत्तम उत्तर दिले त्याकरिता श्री. नितीन निळकंठ सप्रे यांना अनेक धन्यवाद व पुढील उत्तम लेख व कवितांकरिता अनेक शुभेच्छा आहेत!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती