पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - निशब्द कृती (पद्य)

इमेज
निशब्द कृती उघड्या नेत्रांस जाळी दाहकता वास्तवाची  मिटलेल्या पापण्यात दाटी भंगलेल्या स्वप्नांची भरून होते घेतले श्वास अमृताचे कळेना निःश्वास कैसे झाले विषाचे  अधरांवरी जे प्राशिले शीतल चांदणे अवचित त्यांचे कैसे जाहले निखारे स्पर्शात खास होती जाणीव धुंदगंध गेला उडून आता रासलीलेचा सुगंध दुखावती भावना निमित्त काही शब्द उद्ध्वस्तले जीवन करुनी कृती निशब्द रूप रंग ऐहीकाचे सारेच ते भुलविणारे खुणावती संग आता अलौकिकाचे उजळणारे नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  230420241140

स्मृतीबनातून - अलक्षीत कवी

इमेज
अलक्षीत कवी वैद्यक क्षेत्राशी संबंधित अनेकांनी साहित्य आणि संकृतीच्या प्रांतातही ध्यानाकर्षण होईल अशी उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्रा पुरतं बघायचं झालं तर सर्वश्री डॉक्टर श्रीराम लागू, काशिनाथ घाणेकर, मोहन आगाशे, गिरीश ओक, सलील कुलकर्णी अशी नाव पटकन डोळ्यापुढे येतात. कलेच मनाशी फार जवळच नातं आहे असं मला नेहमीच वाटतं. मनाचा शोध हा तसा आत्यंतिक गहन विषय आहे. वैद्यकशात्राचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना मानवी शरीराची जडण घडण शिकत असताना त्याच्या मना कडे जाणाऱ्या वाटेचा ही पत्ता मिळत असावा आणि जो जितका या वाटेवर अधिक वाटचाल करेल त्याला त्याप्रमाणात रसिकांच्या मनाची ओळख होत असावी. शरीर प्रकृतीतल्या विकृती जाणून घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नाडी परीक्षेच्या सरावामुळे रसिकांची नाडी सुध्धा त्यांच्या हाती येत असावी असा आपला माझा एक तर्क आहे. इथे हा सगळा उहापोह करण्याचं कारण म्हणजे माझ्या शालेय दिवसां पासून कानावर पाडणारं एक अत्यंत गोड गीत. कोकीळ सुद्धा हेवा करील असा अत्यंतिक गोड गळा आणि आकर्षक चाल यामुळे त्यावेळी या गीतानी मनात कधी कसा शिरकाव केला ते कळलंच नाही. पुढे ही हे गीत अन्य गीतांच्या बरो...

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

इमेज
  निरंजनी स्वर-माणिक  पहिली भेट दिनांक,दिवस,महिना आठवत नाही पण ऑक्टोबर १९९१ ते ऑक्टोबर १९९२ या कालावधी दरम्यानची ही घटना. आकाशवाणी भोपाळ मधल्या श्रोता अनुसंधान विभागातली माझ्या पहिल्या नोकरीचा राजीनामा देऊन मी  आकाशवाणी मुंबई इथे कार्यक्रम विभागात रुजू झालो होतो. त्या दिवशी सकाळी साडे नऊच्या सुमारास मी नव्या आमदार निवास समोरच्या आकाशवाणी भवनात प्रवेश केला की अलीबाबाच्या गुहेत? असा प्रश्न मला पडला. तिळा तिळा दार उघड न म्हणता अलीबाबाची अफाट संपत्ती असलेली गुहा उघडावी किंवा अल्लादिनचा जादूचा दिवा न घासताही जीन प्रकट व्हावा तशी माझी स्थिती झाली. आत शिरताच सहज म्हणून डावीकडच्या अतिथी कक्षाकडे मान फिरवली. तिथे अगदी सामान्य वेशभूषेत बसलेल्या एका व्यक्ती वर नजर स्थिरावली. त्यांना कुठेतरी पाहिल्या सारखं वाटलं म्हणून मी ही तिथे गेलो. वयाच्या साधारण सहा सात वर्षां पासून आजवर सतत ऐकून मनावर मुद्रित झालेली, ‘अनंता अंत नको पाहू’, ‘अमृताहूनी गोड’, ‘त्या सावळ्या तनुचे’, ‘क्षणभर उघड नयन देवा’, ‘नका विचारू देव कसा’, ‘घन निळा लडिवाळा’, ‘कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम’, ‘विजय पताका श्रीराम...

स्मृतीबनातून - जिवलगा(पद्य)

इमेज
आठवणींच्या मेघातून मन विचरण करत असताना अवचित शीतल समिराच्या झुळकी पाठोपाठ सरसर आलेल्या वर्षा धारांनी काहीसं मलूल झालेलं मन  टवटवित होऊन गुणगुणू लागलं... जिवलगा अंतरातून  आज कुणी साद घाली जिवलगास खिन्नता अशी कुणास काजळी जशी दिव्यास तितुक्यात समिरा सह चंदनी आली झुळूक शुष्क उपवनास त्या फुलण्याची साद देत मिळता दव संजीवन सर्वत्र आला बहर कुसुमी ओला सुवास तरूवर गाती विहंग विखुरला चांदणं प्रकाश सावळ तो आसमंत तरू छायेत दिसे मीरे सह मनमोहन नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com 040420241815 मथुरा