स्मृतीबनातून - जिवलगा(पद्य)

 आठवणींच्या मेघातून मन विचरण करत असताना अवचित शीतल समिराच्या झुळकी पाठोपाठ सरसर आलेल्या वर्षा धारांनी काहीसं मलूल झालेलं मन  टवटवित होऊन गुणगुणू लागलं...

जिवलगा


अंतरातून आज कुणी साद घाली जिवलगास

खिन्नता अशी कुणास काजळी जशी दिव्यास


तितुक्यात समिरा सह चंदनी आली झुळूक

शुष्क उपवनास त्या फुलण्याची साद देत


मिळता दव संजीवन सर्वत्र आला बहर

कुसुमी ओला सुवास तरूवर गाती विहंग


विखुरला चांदणं प्रकाश सावळ तो आसमंत

तरू छायेत दिसे मीरे सह मनमोहन


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

040420241815

मथुरा




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक