पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - गीतसंग(पद्य)

इमेज
रवींद्र संगीत, बाऊल हे संगीत प्रकार जेव्हा केव्हा कानी पहिल्यांदा पडले तेव्हा पासूनच मनाला मोहिनी घालत आलेले आहे. अलीकडे गुरुदेव टागोर यांच्या काही कवितांचा भावानुवाद करत असताना 'Danriye achho tumi aamar gaaner oparey' ( माझ्या गीतातून मी तुला पाहतो) या गीतांनी मन वेधून घेतलं. ते इंग्रजी, रोमन बंगाली, हिंदीतून समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या कुवतीनुसार मराठीत त्याचा भावानुवाद केला. सर्वांना रसास्वाद घेता येईल या कल्पनेतून  मूळ बंगाली गीत, हिंदी गीत(यूट्यूब लिंक), मराठी भावानुवाद या ब्लॉग द्वारे आपल्या समोर मांडला आहे. साधक बाधक अभिप्राय स्वागतार्ह आहेत. 'Danriye achho tumi aamar gaaner oparey. Amar shurguli paay choron, ami pai ne tomare. Batash bohey mori mori, aar bendhe rekho na tori. Esho esho paar hoye mor hridoy majhare. Tomar saathey gaaner khela duurer khela je, Bedonate baanshi bajay shokol bela je. Kobey niye aamar baanshi bajabe go apni ashi; Anondomoy nirob raater nibir aandharey' 'Thou Art there on the far off banks of my songs— My strains awash ...

स्मृतीबनातून - जनन मरण (गीतांजली पद्य)

इमेज
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांचं भाषांतर, भावानुवाद, स्वैर भाषांतर यातील काहीही त्या कृतींच वजन सांभाळून करणं हे कठीण आहे हे मान्य करावंच लागतं. मात्र त्यातील काहींची गेयता आणि आशय चित्ताकर्षक आहे. तेव्हा त्यातल्या काही कविता इंग्लिश, रोमन बंगाली लिपीतून समजतील तश्या आणि जमतील तेवढ्या, मराठीत भावानुवाद करून मांडण्याचा प्रयत्न आहे. गीतांजली या त्यांच्या नोबेल पुरस्कार प्राप्त कृतीतील पहिली कविता...साधक बाधक अभिप्राय जरूर नोंदवा. जनन मरण केलेस तू सुखे मला अनंत नश्वर परी देहास रिते करत फिरुनी एकदा नवा प्राण फुंकीत देह पावरीस घुमवतो कडे कपारीत श्वासा गणिक चैतन्य स्वर छेडीत अमर स्पर्शे तुझ्या हृदय झंकारते आनंदे घेऊन जन्म निशब्दता बोलते अमर्याद तव कृपा आशिर्वचन सांगते लोटली युगे चक्र नित्य चालते (For reference -Thou hast made me endless, such is thy pleasure. This frail vessel thou emptiest again and again, and fillest it ever with fresh life. This little flute of a reed thou hast carried over hills and dales, and hast breathed though it melodies eternally new. At the immortal...

स्मृतीबनातून - जन्माष्टमी (पद्य)

इमेज
डॉक्टर प्रतिमा जगताप यांनी आसावरी काकडे यांच्या कवितेचं केलेलं सादरीकरणा पाठवलं. श्रीकृष्ण राधेच्या अद्वैतावर सांगणारी ही कविता संध्याकाळी गाडीतून घरी परतत असताना ऐकली. तेव्हा मी यमुना सेतुवरच होतो हा निखळ योगायोग...त्यांना अभिप्राय लिहिला. त्यावर त्यांनी उत्तरा दाखल राधेवर ज्या दोन ओळी पाठवल्या त्या मला स्फुरत गेलेल्या कवितेत किंवा विचारात म्हणा चपखल बसल्या. चौथ कडवं तेच आहे... सोबत ही सर्व सृजन प्रक्रिया सुरू करणाऱ्या मूळ सादरीकरणाची लिंक ही देत आहे. मूळ सादरीकारण  क्लिक करा जन्माष्टमी यमुना जळाचे तुषार उडता शरीरी काटा आला गं  राधा-मोहन रास द्वैत सुनयनी अद्वैत झाला गं ll १ ll  काजळ निशा अष्टम तिथी तुरुंगात हा अवतरला गं वसुदेवाच्या डोईवरूनी कापीत फुगली यमुना, वृंदावनी पोहोचला गं ll २ ll  पुतनेसह मारून कालिया नंदा घरी गाई राखिल्या गं मथुरेचा सुपुत्र कान्हा वृंदावनी गोप गोपिकांत रमला गं ll ३ ll  गोरी राधा निळी सावळी सांग कशी झाली गं ? यमुनेलाही काही सुचेना ही गोड शिरशिरी कसली  गं? ll ४ ll  सोडून सारा संसार लौकिक ध्यास मीरेनी धरला गं  मृदुल करांनी छ...

स्मृतीबनातून - एकला चालो रे (पद्य)

इमेज
गुरुदेव टागोरांची अन्य भाषकांना ही माहीत असलेली ही कविता. एक दिवस त्यांची बिपदे मोरी रोख्छा करो या कवितेचा मराठी अर्थ माझ्यापुढे आला आणि मला कुणीतरी शब्द सांगत गेले नी मी ते लिहून काढले जणू, या प्रमाणे माझी प्रार्थना कविता घडली.  त्या नंतर गीतांजलीतल्या फक्त माहीत असलेल्या मोजक्या कवितांचा भावानुवाद करता येईल का? अशी मनानी उचल खाल्ली. अनेक ज्येष्ठांनी 'प्रार्थनेला' प्रोत्साहन पर अभिप्राय आणि आशीर्वाद दिले त्यामुळे थोडा धीर चेपला.  इंग्रजी अनुवाद दिला आहे. आणि शेवटी एकला चालो गीताच्या लिंक दिल्या आहेत. त्या नक्की ऐका. प्रयत्न भावला की नाही ते ब्लॉगच्या अखेरी असलेल्या स्थळी जरूर कळवा. एकला चाल रे न येता कुठूनी साद तू एकला चाल रे एकला चाल एकला चाल एकला चाल  एकला चाल रे न केला जर कुणी संवाद अभाग्या सख्या  तुझ्याशी दुर्लक्षून तुला सकलांनी फेरली दृष्टी भयाने अन्य दिशी सोडूनी दे निज आत्म्यास मुक्त, तू बोल मानसी एकला बोल रे न येता कुठूनी साद तू एकला चाल रे एकला चाल एकला चाल एकला चाल  एकला चाल रे घनवनी तुला देता न साथ सारे मागे फिरतील काटेरी वाटेवर तू रक्तांकित रोवून पाय...

स्मृतीबनातून - स्वातंत्र्य(गीतांजली पद्य)

इमेज
नुकताच भारतानं स्वातंत्र्य दिन साजरा केला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नोबेल पुरस्कार विजेत्या गीतांजली मध्ये 35 वी कविता आहे, 'चित्तो जेथा भयशून्यो' इंग्रजीत Where the mind is without fear. मुंबईत वृत्त विभागात ही कविता फ्रेम करून लावली होती. तेव्हा पासूनच ती मनात उसळ्या मारीत होती. यात टागोरांनी निव्वळ भौगोलिक स्वातंत्र्य नव्हे तर बौद्धिक स्वातंत्र्याची कल्पना मांडली आहे. तीन दशकांहून अधिक सेवाकाल अंतीम चरणात असताना आढावा घेतला असता टागोर यांची ही कल्पना पूर्णत्वाने नसेल कदाचित तरी काही प्रमाणात निश्चित अंमलात आणली याचं समाधान आहे यातूनच या कवितेचा भावानुवाद करण्याची ऊर्मी प्रकटली. बघा तुम्हाला कसा वाटतो हा प्रयत्न... Where the mind is without fear and the head is held high; Where knowledge is free; Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls; Where words come out from the depth of truth; Where tireless striving stretches its arms towards perfection; Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of d...

स्मृतीबनातून - प्रार्थना(पद्य)

इमेज
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं गीतांजली मधील एक अप्रतिम काव्य आणि त्याचा मराठी भावानुवाद... मूळ बंगाली काव्य( मला समजावं यासाठी ते रोमन लिपीत पाठवून माझी सहकारी श्रेया मुखर्जी हिने मोठा सहयोग दिला)आणि इंग्रजी अर्थ Bipade more rokkha karo e nohe mor praarthana – Bipade aami naa jeno kori bhoy . It is not my prayer that you save me from all perils I pray that I should not fear when faced with odds Dukhyotaape byathito chite naai baa dile santanaa, Dukhyey jeno karite paari joy. Console me not when I am torn with misery Grant me instead the will to win against grief Sahaay mor naa jodi jute nijer bol naa jeno tute – Songsaarete ghotile khoti, labhile shudhu bonchona, Nijer mone naa jeno maani khoy. If no help comes forth, let my strength not crumble When losses abound and I am deprived of everything Let my heart not take this as defeat Aamaare tumi koribe traan e nahe mor praarthana – Tarite paari shakati jeno roy. Protect me from the storms is not my prayer Bless me the strength to sail ...

स्मृतीबनातून - धैर्य(पद्य)

इमेज
आज सकाळी एका मैत्रिणीशी ओळख विषयावर बोलताना कवी सुरेश भट यांचा उल्लेख झाला. मी त्यांच्यावर पूर्वी लिहिलेल्या ब्लॉग मधल्या त्यांच्याच दीपदान कवितेच्या काही ओळी वाचून दाखवताना माझ्या मनात ही शब्द दाटून आले. त्यांना ओळीत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न... धैर्य बसल्या अश्या झळा शीतल सावल्यांच्या  भेटलो गळा जेव्हा एकेक स्वकियांच्या  कळपात ना कधी  शिरलो  कुणाच्या सदा राहिलो म्हणून जवळ कुंपणाच्या  तुडवीत गेले जे सारासार विचारांना संवेदना विहीन केले  त्यांनीच  साऱ्यांना मीच माझे न लिहिले सन्मानपत्र त्यांनीच अखेरी केला सन्मान   सर्वत्र जगताना इतके विखारी डंख झाले झाड सोनचंपाचे मीच दारी लावले कानोसा घेत सर्व दिलासा देत गेले कृतीशून्य फुकाचे शब्द सर्व ओकून गेले एकदाच संगरी जीवनाच्या हुतात्मा होऊ घातलो  आप्तांची नव्हे मरणाची वाट पाहू लागलो कोणी मला जवळ केलेच कोठे?  सोईने कार्य  साऱ्यांनी  उरकले होते विपरितात साऱ्या सजवित होतो जीवन सारे समिरानेच घात केला उधळले चित्र सारे कळवू नका कुणाला वृत्त हे पराभवाचे धैर्य अजुनी बाकी तुफान चक्री रोखण्याचे न...