स्मृतीबनातून - एकला चालो रे (पद्य)

गुरुदेव टागोरांची अन्य भाषकांना ही माहीत असलेली ही कविता. एक दिवस त्यांची बिपदे मोरी रोख्छा करो या कवितेचा मराठी अर्थ माझ्यापुढे आला आणि मला कुणीतरी शब्द सांगत गेले नी मी ते लिहून काढले जणू, या प्रमाणे माझी प्रार्थना कविता घडली.  त्या नंतर गीतांजलीतल्या फक्त माहीत असलेल्या मोजक्या कवितांचा भावानुवाद करता येईल का? अशी मनानी उचल खाल्ली. अनेक ज्येष्ठांनी 'प्रार्थनेला' प्रोत्साहन पर अभिप्राय आणि आशीर्वाद दिले त्यामुळे थोडा धीर चेपला.  इंग्रजी अनुवाद दिला आहे. आणि शेवटी एकला चालो गीताच्या लिंक दिल्या आहेत. त्या नक्की ऐका. प्रयत्न भावला की नाही ते ब्लॉगच्या अखेरी असलेल्या स्थळी जरूर कळवा.

एकला चाल रे


1.

न दिला प्रतिसाद कुणी तू एकला चाल रे

एकला चाल एकला चाल एकला चाल  एकला चाल रे

  केला कुणी संवाद तुजसी, रे अभाग्या  
 फिरवून पाठ सकल, फेरती दृष्टी भयानी
 सोडूनी दे मुक्त निज आत्म्यास, तू बोल   मानसी
 एकला बोल रे
 न दिला प्रतिसाद कुणी तू एकला चाल रे
 एकला चाल एकला चाल एकला चाल   एकला चाल रे

 घनवनी सोडून, सारे मागे फिरतील
 काटेरी वाटेत रोव रक्त पाय, धीट 
 चाल
 येतील कृष्णमेघ, काजळ होईल सत्य
 जग तुकविल मान, गर्भगळीत होती मर्त्य
 हो ज्योत, पेटवं मशाल, उजळ सृष्टि दिप्त
 हो एकला प्रदीप्त रे 

 न दिला प्रतिसाद कुणी तू एकला चाल रे
 एकला चाल एकला चाल एकला चाल       एकला चाल रे

2.
न दिला प्रतिsसाद कुणी, तू एकला चाल रे
एकला चाल, एकला चाल, एकला चाल, एकला चाल रे।

न केला कुणी संवाद तुजसी, रे अभाग्या 
तुजकडे फिरवून पाठ, भयभीत सर्व
होऊन आत्म मुक्त, तू मनीचे बोल बोल रे
एकला बोल रे

सोडून तुला सारे गेले माघारी, रे अभाग्या 
क्रमिता कठीण मार्ग पाहिले न मागे वळून
तुडव काटेरी वाट रुधिर चरण, पुढे
एकला चाल रे 

कुणी न जर दाखवती उजेड, रे अभाग्या 
पावसाळी तिमिर रात्री, जर मिटली द्वारे
पेटव अंतर दीप, त्या तडिता अग्नी रूपे
आलोकी एकला चाल रे 

यदि तोर डाक शुने केउ ना आसे तबे एकला चलो रे एकला चलो, एकला चलो, एकला चलो, एकला चलो रे।

यदि केउ कथा ना कय, ओरे ओरे ओ अभागा, यदि सबाई थाके मुख फिराये, सबाई करे भय—तबे मुठि खुपे तुइ सप्रणे तोर मनेर कथा एकला बलो रे।

यदि सबाई फिरे जाय, ओरे ओरे ओ अभागा,

यदि गहन पथे याबार काले केउ फिरे ना चाय—तबे पथेर काँटा निजिर रक्ते चरन दले एकला चलो रे।

यदि आलो ना धरे, ओरे ओरे ओ अभागा,यदि झड़-बादले आँधार राते दुआर देय घरे—तबे वज्रानले आपन बुकेर पाँजोर ज्वालिये निये एकला चलो रे।



एकला चालो रे -किशोर कुमार


एकला चालो रे इंग्रजी सह उषा उत्थुप


एकला चालो रे - श्रेया घोषाल



नितीन सप्रे
  nitinnsapre@gmail.com 
  220820241855/10052026
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती