स्मृतीबनातून - जनन मरण (गीतांजली पद्य)
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांचं भाषांतर, भावानुवाद, स्वैर भाषांतर यातील काहीही त्या कृतींच वजन सांभाळून करणं हे कठीण आहे हे मान्यच करावं लागतं. मात्र त्यातील काहींची गेयता आणि आशय चित्ताकर्षक आहे. तेव्हा त्यातल्या काही कविता इंग्लिश, रोमन बंगाली देवनागरी लिपीतून समजतील तशा आणि जमतील तेवढ्या, मराठीत भावानुवाद करून मांडण्याचा प्रयत्न आहे. गीतांजली या त्यांच्या नोबेल पुरस्कार प्राप्त कृतीतील पहिली कविता...
या कवितेत टागोर म्हणतात की, मानवी शरीर जरी नश्वर असले, तरी आत्मा अमर आहे. ईश्वर माणसाला केवळ जीवनच देत नाही, तर त्याच्या माध्यमातून स्वतःचे दैवी संगीत (कला आणि विचार) जगासमोर मांडतो. ईश्वराची कृपा देण्याची शक्ती अफाट आहे आणि ती स्वीकारताना कवी स्वतःला नतमस्तक मानतात.
For reference -Thou hast made me endless, such is thy pleasure.
This frail vessel thou emptiest again and again,
and fillest it ever with fresh life.
This little flute of a reed
thou hast carried over hills and dales,
and hast breathed though it melodies eternally new.
At the immortal touch of thy hands
my little heart loses its limits in joy and gives birth
to utterance ineffable.
Thy infinite gifts come to me only
on these very small hands of mine.
Ages pass, and still thou pourest
and still there is room to fill.)
जनन मरण
1.
लीला तव अगाध केले मज अनंत
नश्वर देहास फिरुनी रिते करत
लीला तव अगाध नव प्राण कुडीत
देह पावरी घुमते कडे कपारीत
ये श्वास अनादी चैतन्य स्वर छेडीत
अमर स्पर्शे तुझ्या हृदय झंकारते
लांघून सीमा दिव्य शब्दांना जन्म देते
अमर्याद कृपा आशिर्वचन सांगते
लोटली युगे चक्र तव नित्य चालते
2.
अन्तहीन कोरेछो आमाय एइ तो तोमार लीला।
एइ ये मरण-पात्रखानि भरिये बारम्बार
फिराये दाओ नूतन प्राणे, एइ तो तोमार लीला॥
एइ ये छोटो बाँशिर बाँशि, पाहाड़े ओ पाथरे
बेड़ियेबेड़ाओ बाजाओ कतो सुरेर उपहारे—
एइ ये अमर हातेर परश पेये आमार प्राण
भासाये देय सीमार बाहिरे कतोइ अबोध गान॥
तोमार असीम दान ये आसे आमार छोटो हाते,
युगान्तरे कतोइ दिले, तबुओ कतोइ बाकि—
आमार छोटो हियाटिटे कतोइ जागा दिय।
लीला तव अपार केले मज अंतहीन
मरणाधीन देहपात्रि फिरुनी भरतोस प्राण
देहरूपी बासरीस दरीखोऱ्यात फिरवतोस
नवनवे ते स्वर सुरेल त्यामधून काढतोस
पाणिग्रही करशी जसा तव करस्पर्श अमर
सीमा उल्लंघुन सुरू प्राणांचे ते अबोध गायन
असीम दान तुझे सामावते मम हातात सान
युगानुयुगे देणारा तू परी झोळी माझी लहान
तव प्रेमकृपे स्तव मम हृदयी जागा अमाप
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
290820241315/230420261616
New Delhi/Thane

खूप छान आहे
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌🏼 व सुंदर .... शब्दलालित्याचा मनमोहक पिसारा फुललाय....
उत्तर द्याहटवाHeart touching, Marathi verse.
उत्तर द्याहटवादेह पावरीस घुमवितो...अहाहा खूप सुंदर.. अभिनंदन 🙏🏽💐
उत्तर द्याहटवा