स्मृतीबनातून - जन्माष्टमी (पद्य)
डॉक्टर प्रतिमा जगताप यांनी आसावरी काकडे यांच्या कवितेचं केलेलं सादरीकरणा पाठवलं. श्रीकृष्ण राधेच्या अद्वैतावर सांगणारी ही कविता संध्याकाळी गाडीतून घरी परतत असताना ऐकली. तेव्हा मी यमुना सेतुवरच होतो हा निखळ योगायोग...त्यांना अभिप्राय लिहिला. त्यावर त्यांनी उत्तरा दाखल राधेवर ज्या दोन ओळी पाठवल्या त्या मला स्फुरत गेलेल्या कवितेत किंवा विचारात म्हणा चपखल बसल्या. चौथ कडवं तेच आहे... सोबत ही सर्व सृजन प्रक्रिया सुरू करणाऱ्या मूळ सादरीकरणाची लिंक ही देत आहे.
मूळ सादरीकारण क्लिक करा
जन्माष्टमी
राधा-मोहन रास द्वैत सुनयनी अद्वैत झाला गं ll १ ll
काजळ निशा अष्टम तिथी तुरुंगात हा अवतरला गं
वसुदेवाच्या डोईवरूनी कापीत फुगली यमुना, वृंदावनी पोहोचला गं ll २ ll
पुतनेसह मारून कालिया नंदा घरी गाई राखिल्या गं
मथुरेचा सुपुत्र कान्हा वृंदावनी गोप गोपिकांत रमला गं ll ३ ll
गोरी राधा निळी सावळी सांग कशी झाली गं ?
यमुनेलाही काही सुचेना ही गोड शिरशिरी कसली
गं? ll ४ ll
सोडून सारा संसार लौकिक ध्यास मीरेनी धरला गं
मृदुल करांनी छेडून तारा हरी गीतास आळविले गं ll ५ ll
सहस्रनारी असून सुद्धा खरा समजला राधू मीरेस गं
करून जगती क्रीडा साऱ्या नाही कुठे अडकला गं ll ६ ll
तारीले पांडव द्रौपदीसह भीष्म कर्णाचा न्याय केला गं
कुरुक्षेत्रावर थरथरत्या पार्था गीता सांगून कर्मयोग शिकवला गं ll ७ ll
शस्त्र हाती न घेवून सुद्धा महाभारत घडविले गं
येईल ग्लानी धर्मास जेव्हा येईन सांगुन परतला गं ll ८ ll
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
260820241930(जन्माष्टमी)
नवी दिल्ली
सुंदर कविता
उत्तर द्याहटवासुरेख काव्य
उत्तर द्याहटवाएक छोटंसं काव्यबीज काळजात रुजलं आणि अवघं श्रीकृष्ण चरित्र काव्य तुम्हाला स्फुरलं ...विलक्षण उत्स्फूर्तता ! अभिनंदन 💐🙏🏽
उत्तर द्याहटवा