स्मृतीबनातून - अबोला (पद्य 19)
गुरुदेव टागोर म्हणतात तू (परमेश्वर)सध्या माझ्याशी अबोला धरला आहेस. मी शांत राहून धैर्य पूर्वक त्याला सामोरा जाईन. मला खात्री आहे हा अबोला काही कायम स्वरुपी नाही. एक ना एक दिवस तू प्रसन्न होऊन माझ्याशी अबोला सोडशील. तेव्हा आकाशवाणी होऊन तुझे सोनशब्द कानी पडतील. त्यांची सुरेल गाणी होतील आणि पक्षांच्या घरट्यातून ती ऐकू येतील आणि ती गाणी गातच उपवनात फुलं ही उमलतील.
If thou speakest not I will fill my heart with thy silence and endure it. I will keep still and wait like the night with starry vigil and its head bent low with patience.
The morning will surely come, the darkness will vanish, and thy voice pour down in golden streams breaking through the sky.
Then thy words will take wing in songs from every one of my birds' nests, and thy melodies will break forth in flowers in all my forest groves.(Geetanjali song 19)
अबोला
तू अबोल राहिलास जरी
मौन मी राखीन मनी
साहीन सर्व, शांत राहुनी
तारकामय रात्रीसम, सदैव जागुनी
धैर्याने वाणीची, वाट पाहूनी
उषःकाल, होऊन हा राहील
तमही निशेचा, मग सरेल
तुझी आकाशवाणी ती होईल
सोनशब्द तो कानी पडेल
शब्द ते, गीतरूप घेतील
वाहतील, नीडा नीडातूनी सुरेल
उपवन, स्वरांनी त्या बहरेल
गाणी गातच, फुलेही उमलतील
2.
मौनात राहुनी तू न बोलणार काही
नीरवता ही अशीच हृदयात मी भरीन
ताऱ्यांचे लावुनी दीप रजनीस नीज नाही
धैर्ये साहिन मौन तक्रार नाही काही
अंतरी जाणतो मी पहाट फुटी होईल
सारून तम निशेचा तव मौनही सरेल
तुझे सोन शब्द घेतील गीत रूप
माझिया वन लता स्वर धारेत बहरतील
110320251735
७१/19
3.
हे मौनधारी धर खुशाल तू अबोला
ठेवीन जपून हृदयी साहिन निमूट त्याला
उजळवून तारका गगनी अनिमिष जागते रजनी
अनुसरण तिचे करुनी
साहिन मनी ठेवुनी
उषःकाल हा होणारच
तमही निषेचा सरणार
तुझे कांचनी बोल
आकाश चिरून येतील
पाखरू मनातील माझ्या
जागेल शब्दांनी तुझ्या
फुलतील सुमने तेव्हा
उमजून मौनाची भाषा
190420250930
ठाणे
७१/19
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
021020242300
घटस्थापना
शिमला
खूपच छान
उत्तर द्याहटवा