स्मृतीबनातून - प्रतिभा पंख( गीतांजली पद्य 2)

मी कवी अथवा लेखकही नाही. मी चांगला वेचक मात्र आहे. जे जे चांगलं वेचतो ते ते भावभंग न करता शब्दांद्वारे आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आजवर एकही विपरीत अभिप्राय न देवून आपण माझं धाडस वाढवलं आहे. म्हणूनच गीतांजली या गुरुदेव टागोर यांच्या काव्य संग्रहातील काव्याचा/गीतांचा भावानुवाद करावा अशी आपल्या वाचकांपैकीच काहींनी केलेली सूचना मनावर घेतली आहे. आपले साधक बाधक अभिप्राय महत्त्वाचे आहे

गीतांजलीतील हे दुसरे पुष्प. मूळ बंगाली पण रविंद्रनाथांनीच केलेल्या इंग्रजी भाषांतरा वरून केलेला हा मराठी भावानुवाद...ब्लॉग आवडल्यास अन्य मंडळींना तो अग्रेशीत करू शकता.

'When thou commandest me to sing it seems that my heart would break with pride; and I look to thy face, and tears come to my eyes.

All that is harsh and dissonant in my life melts into one sweet harmony—and my adoration spreads wings like a glad bird on its flight across the sea.

I know thou takest pleasure in my singing. I know that only as a singer I come before thy presence.

I touch by the edge of the far spreading wing of my song thy feet which I could never aspire to reach.

Drunk with the joy of singing I forget myself and call thee friend who art my lord'(Geetaanjali 2)


प्रतिभा पंख


देता तू शब्द सूर हृदयी मी प्रफुल्लित 
घेता तव दर्शन भरून आले या नयनांत नीर

कठीण जे मम जीवनी सद्भवात ते वितळूनी
श्रद्धा ती झेपावते जसे निघती खग देशांतरी

जाणतो होशी प्रसन्न तू माझ्या शब्द सुरांनी
जाणतो येतो तव समीप याच शब्द सुरांनी

विस्तारीत प्रतिभा पंख करितो तव चरण स्पर्श

शब्दच हे जागविती कांक्षा, नमले माझे शीर्ष

स्वरांनी होता मी धुंद, पडे विसर स्वपणाला
निकट इतुका येतो ईशा कवळावे जणू मित्राला


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

040920241230



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक