स्मृतीबनातून - वारसा यात्रा(पद्य)
देवभूमी हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला नगरीचा प्रवास करण्याची इच्छा अचानक फलद्रूप झाली. कडी म्हणजे माझा सहकारी मित्र प्रकाश पंत यानी इतर व्यवस्थे प्रमाणे शिमला-कालका वारसा छोटी रेल्वे आणि पुढे शताब्दी ने माझी दिल्लीला पाठवणी केली. कंडाघाट स्थानका पर्यंत सुचलेले हे पद्य विचार...
वारसा यात्रा
आज उगवला, दिवस न्यारा
शिमला कालका, प्रवास घडला
गाडीने छोट्या, लहान केले
साठी मधले, दुसरीत गेले
तीस आसनी, डब्यात चढता
बदलत गेलो, जागा कितीदा
सान थोर, प्रवासी सारे
दशम वयाचे, होऊन गेले
सात डब्यांची, वारस गाडी
वळस रुळांवर, नागीण झाली
अगीन राहिली, नव्हती आता
पित होती, तेल धावता
प्रथम, द्वितीय, भेद होता
समान होता, निसर्ग गारवा
दोहो बाजूस, शिवालिक रांगा
पहारा हरित प्रेमल होता
सुरू,ओक,देवदार शिपाई
देवभूमीची ही बात निराळी
परत फिरता हळवे काळीज
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
041020241306
शिमला - कालका
सुंदर. खरंय...देवभुमीची बातच वेगळी....
उत्तर द्याहटवाकाव्य इतके सुरेख आहे की जणू काही आपणच आगगाडीतून प्रवास करतोय असेच वाटले.
उत्तर द्याहटवा