स्मृतीबनातून - मी'पण बुडू दे अश्रूसागरी(पद्य)
ब्राम्हो समाजाच्या ब्राम्होत्सवात 2 मे 1883 रोजी कोलकाता(उत्तर) इथे श्रीरामकृष्ण परमहंस आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची काशिश्वर मित्रा कुटुंबियांच्या घरी पहिली आणि अखेरची भेट झाली अशी माहिती मिळते. ब्राह्मोत्सवासाठी ते दोघेही निमंत्रित होते. त्यावेळी टागोर 22 वर्षांचे होते आणि त्यांनी पियानो वाजवून आपलं एक गीत श्रीरामकृष्ण यांच्या सम्मुख सादर केलं. माझी DD इंडिया मधील एक बंगाली सहकारी श्रेया मुखर्जी हिने मला या संदर्भात माहिती देत मूळ बंगाली गीत पाठवलं त्याचा इंग्रजी अनुवाद वाचून केलेला हा मराठी भावानुवाद...
Songs
the worship
492
(amar matha nata kare)
Bow my head under your feet.
Drown all my pride in tears.
To glorify myself is to dishonor myself.
All you have to do is spin around and die.
Drown all my pride in tears.
Let me not promote my own work,
Make your wish in my life.
Jachi, O Thy supreme peace, Parane Thy supreme Kanti,
Hide me and stand in the lotus heart.
Drown all my pride in tears.
Raga: Emankalyan
Rhythm: Teora
Date of Composition (Bangabda): 1313
Date of Composition (AD): 1906
Composer: Kangalicharan Sen
'मी'पण बुडू दे अश्रूसागरी
नतमस्तक मी तव चरणासी
'मी'पण बुडू दे अश्रूसागरी
मनी जाण, स्व-गौरव करुनी
स्वतःस तू, स्वतः अपमानी
'मी'पण बुडू दे अश्रूसागरी
परतून जाणे फेर धरुनी
इतुकेच जगी, मनुजाच्या हाती
'मी'पण बुडू दे अश्रूसागरी
कर्म करावे प्रचार नाही
माझे जगणे इच्छा तुझी
'मी'पण बुडू दे अश्रूसागरी
दिव्यमुर्ती तव मनी पुजुनी
परम शांती लाभुदे सर्वांसी
'मी'पण बुडू दे अश्रूसागरी
'स्व'पण अवघे दे सारुनी
सदा वसावेस मम अंतर्यामी
'मी'पण बुडू दे अश्रूसागरी
ऐकण्यासाठी क्लिक करा - आमार माथा नत कोरो
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
040920240925
नवी दिल्ली
खूपच गूढ आणि अंतर्यामी रचना. ग्रेस यांची आठवण आली.
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवा