स्मृतीबनातून - स्वरअर्णव अमृताचा(पद्य)
तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित
गानसम्राज्ञी लता मंगेशकर जन्मदिनानिमित्त विशेष काव्य लेखन स्पर्धा...श्रेणी ...प्रथम पुरस्कार जाहीर
दि.२८-९-२०२४
विषय.. लता मंगेशकर आणि संगीत
स्वरअर्णव अमृताचा
नितीन सप्रे, नवी दिल्ली
9869375422
स्वरअर्णव अमृताचा
हे हेमलते कसे वर्णावे तव गान ते
कंठी तुझ्या वसती साक्षात सप्त सूर ते
गंधार युक्त सूरांनी अवघे विश्व व्यापले
स्वर रश्मींनी तुझ्या कसे विश्व हे आलोकिले
जन्म घेण्या आधीच दैविगुण तातांनी जाणले
जगतरत्न होऊनी ते तू सत्य ठरविले
गायलीस तू 'कल्पवृक्ष लावूनिया बाबा' गेले
शोभली कन्या झाली वटवृक्ष मंगेश कृपेने
सूरां विना तुझ्या जग असुर असते वाटले
धन्य झालो आम्ही जगलो तुझ्या सूरां सवे
अजर झालो सारे आम्ही ऐकोनी तुझी गीते
अर्णव अमृताचा कोकीळ कंठातील सूर ते
(टीप: लता दीदी यांचं मूळ नाव हेमा हर्डीकर म्हणून हेमलते, अर्णव=समुद्र)
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
9869375422

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा