पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - दिल का दिल से बुलावा

इमेज
व्याकरणात जरी फारशी गती नसली तरी संगीताच्या सौंदर्याचा मी निस्सीम चाहता आहे. गेले काही दिवस यमनाची सुरावट मनात रुंजी घालते आहे. यमनावर आधारित गीतांनी भोवती फेर धरला आहे आणि जब दीप जले तर शब्दरूप पालटून साकारलं. बघा रूचतंय का ते....      (चित्र सौजन्य...स्वाती वर्तक) दिल का दिल से बुलावा जब नैन छलके आना जब दिल मचले आना तुम्हे पलकों मे, झुलाता हुं  तस्वीsरसे, मन बहलाता हुं  दिल में तुम्हे बसाया हैं, दिल से कभी नाs जाना जब नैन छलके आना नी ग रे, ग रे, म ग रे सा सा नी म म प, ग रे, नी सा ग सा प म प तेरी याद मे जब खो जाsऊंगा दर्दे दिल से, पुकारुंगा फहरा के अपनी बाहों को, आगोश मे ले लेना जब नैन छलके आना जब नजरें चार हुई थी, सनम आंखों से दिल में उतरी थी तुम रग रग मे समाs गयी होs तुम अब कैसे तुम्हे भुsलाना जब नैन छलके आना जब दिल मचले आना  नितीन सप्रे 310120251900 ठाणे

स्मृतीबनातून - स्वरअर्णव अमृताचा(पद्य)

 तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित  गानसम्राज्ञी लता मंगेशकर जन्मदिनानिमित्त विशेष काव्य लेखन स्पर्धा..प्रथम पुरस्कार जाहीर दि.२८-९-२०२४ विषय.. लता मंगेशकर आणि संगीत स्वरअर्णव अमृताचा नितीन सप्रे, नवी दिल्ली 9869375422 स्वरअर्णव अमृताचा हे हेमलते कसे वर्णावे तव गान ते कंठी तुझ्या वसती साक्षात सप्त सूर ते गंधार युक्त सूरांनी तुझ्या अवघे विश्व व्यापले स्वर रश्मींनी तुझ्या कसे विश्व हे आलोकीले जन्म घेण्या आधीच दैविगुण तातांनी जाणले जगतरत्न होऊनी लते ते तू सत्य ठरविले गायलीस तू 'कल्प वृक्ष लावूनिया बाबा' गेले शोभली कन्या झाली वट वृक्ष श्रीमंगेश कृपेने सूरां विना तुझ्या जग असुर असते वाटले  धन्य झालो आम्ही जगलो तुझ्या सूरां सवे अजर झालो सारे आम्ही ऐकोनी तुझी गीते अर्णव अमृताचा कोकीळ कंठातील तुझे सूर ते नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  9869375422

स्मृतीबनातून-स्वीकार(पद्य)

इमेज
स्वीकार पेण मध्ये सकाळच्या फेरफटक्यात सूर्याचे लालबुंद बिंब प्राचीवर दृष्टीस पडले. सर्वप्रथम आठवण झाली ती कट्यार मधल्या खां साहेबांची. सकाळच्या फेरीत सूर्योदय होत असताना कानावर आलेले तेजोनिधी लोहगोल हे गीत....त्यानंतर आठवलं अभिषेकी बुवांच सखी शशी वदने हे ललत रागातील पद...आणि कुसुमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेले पृथ्वीचं प्रेमगीत...अश्या उत्तुंग प्रतिभेच्या आविष्कारां नंतर मला स्फुरलेली किंचित कल्पना.  प्राचीवरी रवी लाल आला तो उदयास पुर्वेची अपूर्व शोभा मग उतरली तळ्यात प्रश्न उमटला का रोज उगवतो हा? भेटण्या कुणास होतो असा अधीर  हा? का हा नित्य येतो उमजले क्षणात पृथ्वीस सांगतो स्वीकारला तव प्रेम प्रस्ताव  नितीन सप्रे 1101202508, पेण