स्मृतीबनातून-स्वीकार(पद्य)
स्वीकार
पेण मध्ये सकाळच्या फेरफटक्यात सूर्याचे लालबुंद बिंब प्राचीवर दृष्टीस पडले. सर्वप्रथम आठवण झाली ती कट्यार मधल्या खां साहेबांची. सकाळच्या फेरीत सूर्योदय होत असताना कानावर आलेले तेजोनिधी लोहगोल हे गीत....त्यानंतर आठवलं अभिषेकी बुवांच सखी शशी वदने हे ललत रागातील पद...आणि कुसुमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेले पृथ्वीचं प्रेमगीत...अश्या उत्तुंग प्रतिभेच्या आविष्कारां नंतर मला स्फुरलेली किंचित कल्पना.
प्राचीवरी रवी लाल आला तो उदयास
पुर्वेची अपूर्व शोभा मग उतरली तळ्यात
प्रश्न उमटला का रोज उगवतो हा?
भेटण्या कुणास होतो असा अधीर हा?
का हा नित्य येतो उमजले क्षणात
पृथ्वीस सांगतो स्वीकारला तव प्रेम प्रस्ताव
नितीन सप्रे
1101202508, पेण
व्वा वा क्या बात है 👍
उत्तर द्याहटवा