स्मृतीबनातून - स्वरअर्णव अमृताचा(पद्य)

 तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर जन्मदिनानिमित्त विशेष काव्य लेखन स्पर्धा..प्रथम पुरस्कार जाहीर

दि.२८-९-२०२४

विषय.. लता मंगेशकर आणि संगीत

स्वरअर्णव अमृताचा

नितीन सप्रे, नवी दिल्ली

9869375422




स्वरअर्णव अमृताचा


हे हेमलते कसे वर्णावे तव गान ते

कंठी तुझ्या वसती साक्षात सप्त सूर ते

गंधार युक्त सूरांनी तुझ्या अवघे विश्व व्यापले

स्वर रश्मींनी तुझ्या कसे विश्व हे आलोकीले


जन्म घेण्या आधीच दैविगुण तातांनी जाणले

जगतरत्न होऊनी लते ते तू सत्य ठरविले

गायलीस तू 'कल्प वृक्ष लावूनिया बाबा' गेले

शोभली कन्या झाली वट वृक्ष श्रीमंगेश कृपेने


सूरां विना तुझ्या जग असुर असते वाटले 

धन्य झालो आम्ही जगलो तुझ्या सूरां सवे

अजर झालो सारे आम्ही ऐकोनी तुझी गीते

अर्णव अमृताचा कोकीळ कंठातील तुझे सूर ते


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

9869375422

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक