स्मृतीबनातून शिवास्तुती(पद्य)
शिवास्तुती
कडकडला सह्याद्री, दशदिशा या गडगडल्या
दख्खन प्रांती, नृसिंह शिवा अवतरला
ll ध्रु ll
रक्षीयला आर्य, निःपात शत्रूचा केला
अभिमाने देशी, भगवा ध्वज फडकवला
ll १ ll
करुनी नाश दुष्कृतीचा, परपाश झुगारुन दिधला
बांधुनी स्वराज्य तोरण, छत्रपती शिवबा झाला
ll २ ll
ही तो श्रींची इच्छा, वदुनी
केला, कारभार नेटका न्यायानी
सर्वत्र जाणला गेला जाणता राजा म्हणुनी
ll ३ ll
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
120220252055
माघ पौर्णिमा

अप्रतिम....
उत्तर द्याहटवा