स्मृतीबनातून विश्वगान (पद्य ३६/70)
Is it beyond thee to be glad with the
gladness of this rhythm? To be tossedand lost and broken in the whirl of this
fearful joy?
they look not behind, no power
hold them back, they rush on.
music, seasons come dancing and pass
away––colours, tunes, and perfumes
pour in endless cascades in the abound-
ing joy that scatters and gives up and
dies every moment.(पारबी ना की जोग दिते ३६/70)
वविश्वगान
का न मिळविशी सुरात सूर?
आनंदी इथल्या लहरीं मध्ये
तुटून मोडून झोकून द्यावे
दिला कान तर ऐकू येतील
गगनी यमवीणेचे सूर सुरेल
चंद्र,सूर्य तारकाsही येथील
मोदे, नित्य धावतात उज्वल
दिग्गज सारे कलावंत हे
अजर स्वरांचे छेडून गाणे
चराचरास अवघे करून वेडे
सांगणार कोण, जातात कुठे?
या मोदाच्या ताला वरती
सहा ऋतू हे नाचत येती
रूप गंध नजराणा देती
चरात मिसळून विरून जाती
पदन्यास कर या ठेक्यावरती
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
070320251525
(गीतांजली मूळ बांगला ३६, इंग्रजी 70)
व्वा वा, फारच उत्तम 🙏
उत्तर द्याहटवा👌👍
उत्तर द्याहटवासुंदर !! अजर स्वर !
उत्तर द्याहटवा