स्मृतीबनातून अतिथी(पद्य)

Sharote aaj kon otithi elo praaner dwaare.
Aanondogaan gaa re hriday,    aanondogaan gaa re.
Nil aakesher nirob kotha    shishir-bheja byakulata
Beje uthuk aaji tomar binar taare taare.
Shashyakheter sonar gaane    jog de re aaj saman taane,
Bhaasiye de sur bhara nodir amol jalodhaare.
Je esechhe taahar mukhe    dekh re cheye gobhir sukhe,
Duwar khule taahar saathe baahir hoye ja re.


परमेश्वर भक्तीचा शरद ऋतू एकदा का भक्ताच्या आयुष्यात अवतरला की भवबंधन, भवताप शीतळ होतो. तो सहजीच प्रभुसेवेत लीन होतो हेच गुरुदेव टागोर यांनी  या कवितेतून व्यक्त केलं आहे. 

अतिथी


शरद ऋतुचा मुहूर्त साधून

हृदय मंदिरी आला कोण?

गाऊया रे आता आनंदगान 

गाऊया आनंदगान 


निरभ्र नीलनभ कहाणी नीरव

त्यात विखुरले व्याकुळ शिशिर दव 

मिसळून त्यात तव वीणेचा रव 

ऐकू येऊ दे प्रसन्न गुंजारव


गर्भार धरती सोन गाणे

सूर मेळवित गाती तराणे

निर्मल पावन संगीत लेणे 

झोकून जीवन सरितेत वाहणे 


न्याहाळ दिव्य अतिथीचे मुख

दिसेल सखोल अंतरंगीचे सुख

झुगार आता सर्व भवबंधनं 

स्वीकार त्याला हृदया पासून


(गीतांजली मूळ बांगला ३८)

नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

100320250830

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक