स्मृतीबनातून अखेरची मागणी(पद्य)
जीवन जखन शुकाये जाय
अखेरची मागणी
जीवाची मम होईल काहीली
होता निरस, मन, वचन, वैखरी
शुष्क अशा माझ्या जीवनी
जाई घन आषाढासम बरसुनी
सरता हृदयी माधवी मधुपर्क
येई घेउनी स्वर सुधारस अर्क
हे रसेश्वर हो करुणाघन
मधुरसात टाक ह्रदयाला मुरवून
कर्मकर्कशता येता, भक्ती लोपून
हळूच पावली हृदयी येऊन
वावटळीस त्या तिथेच नमवून
निर्मल प्रसन्न करी तू जीवन
अनुदारीता गेली कधी मनास व्यापून
उदार नाथा ये तू धावून
कृपा करी मजवर तेथे राहून
देई जगताला हे तू दाऊन
नोहे घर रंकाचे आपितु राजभवन
अन् अखेरीस मागणे हे पण
क्षुद्र वासनाचे करी निर्दालन
आलोकी ने मज काळोखातून
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
160320251335
चालू ठेव मित्रा।
उत्तर द्याहटवाव्वा वा, छानच 💐😊
उत्तर द्याहटवा