स्मृतीबनातून प्रतीक्षा/एकरूप(पद्य)

 

गुरुदेव टागोर यांच्या गीतांजली या काव्य संग्रहातील हे 17 वे पुष्प...या गीतात ते ईश्वरा बरोबर तादात्म्य साधता यावं यासाठी संपूर्ण समर्पण करण्याची त्याच्याशी एकरूप होण्याची आस बाळगून आहेत

Premer haate dhora debo
Taai royechhi boshe
Onek deri hoye gelo
Doshi onek doshe
BidhiBidhan-Bandhon dore
Dhorte ashe,jaai se sore.
Taar laagi ja shasti nebar
Nebo moner toshe.
Premer haate dhora debo
Tai royechhi boshe.

Loke aamay ninda kore
Ninda se noy michhe
Sokol ninda mathaye dhore
Robo sobar niche
Sesh hoye gelo je bela
Bhanglo becha-kenar mela
Daakte jara eshechhilo
Phirlo tara roshe
Premer haate dhora debo
Taai royechhi boshe

प्रतीक्षा

प्रेमल हाती व्हावे अर्पण

प्रतिक्षेत त्याच्या आहे थांबून

काळ बराच गेला निघून

दोष, क्षति घडल्या हातून

विधि विधान रज्जूत बांधून

लोक पाहती, गेलो निसटून

या मी केल्या अपराधातून

सुटेन, मोदे शिक्षा भोगून

प्रेमल हाती व्हावे अर्पण

प्रतिक्षेत त्याच्या आहे थांबून

बोलती जन मजला निंदून 

शेवटास मी बसून राहीन

काळ बेला गेली निघून

बाजार जडाचा गेला भंगून 

बोलविण्यास मज आलेले जन 

रागे भरून गेले निघून

प्रेमल हाती व्हावे अर्पण

प्रतिक्षेत त्याच्या आहे थांबून


(मूळ बांगला १५१ इंग्रजी 17... रवींद्र झंकार काका कालेलकर पान १४८)


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

230320251830


I am only waiting for love to give myself up at last into his hands. That is why it is so late and why I have been guilty of such omissions.


They come with their laws and their codes to bind me fast; but I evade them ever, for I am only waiting for love to give myself up at last into his hands.


People blame me and call me heedless; I doubt not they are right in their blame.


The market day is over and work is all done for the busy. Those who came to call me in vain have gone back in anger. I am only waiting for love to give myself up at last into his hands.


एकरूप

आस एकल ही मनी असे
एकरूप व्हावे तुझ्या सवे
पात्र होण्या उशीर झाला
का हा माझा दोष असे?

जगात येता जखडून गेलो
पाप-पुण्य या भ्रमात फसलो
कल्पना बेगड्या झुगारीत आलो
प्रेमापोटी सारे करीत गेलो

त्यागीले मी जसे लौकिकाला
मजवरी योग्यची बोल लागला
म्हणे मी संसार सोडिला 

झाला आता बाजार उठला
कर्मयोग तो करून झाला
पसारा रागे सोडून गेला
आस एकच मनी असे
एकरूप व्हावे तुझ्या सवे


नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com 
230920241540
नवी दिल्ली

(टीप: गुरुदेव टागोरांच्या या कवितेचे दोन स्वतंत्र भावानुवाद केले गेले प्रथम एकरूप या शीर्षकाचा जो त्यांच्या इंग्रजी काव्य वरून केलेला आणि नंतर प्रतीक्षा शीर्षक असलेला त्यांच्या मूळ बांगला गीतावरून केलेला) 


टिप्पण्या

  1. Khup मस्त. तू आहेसच तसा सुंदर, विवेकी v sarasar विचारवंत. Hariom

    उत्तर द्याहटवा
  2. मला "प्रतीक्षा" या कवितेपेक्षा "एकरूप" ही कविता जास्त भावली.

    उत्तर द्याहटवा
  3. अनुवाद सुरेख साधला आहे. मूळ रचनेतील भाव प्रगट झाले आहेत. छान !

    उत्तर द्याहटवा
  4. दोन्ही अनुवाद हळुवार आणि भावुक आहेत. तरीही इंग्रजी किंचित उजवा आहे...

    उत्तर द्याहटवा
  5. ईश्वराशी एकरुप होण्याची समर्पित भावना!🙏🏽🌷

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक