स्मृतीबनातून फसगत (पद्य)



When it was day they came into my house and said, 'We shall onlypctake the smallest room.' 


They said, 'We shall help you in the worship of your God and humbly accept only our own share in his grace'; and then they took their seat in a corner and they sat quiet and meek.


But in the darkness of night I find they break into my sacred shrine, strong and turbulent, and snatch with unholy greed the offerings from God's altar.


फसगत


स्वीकार मूळ रुपी होणार नाही, वासना हे जाणती

आणुनी भक्तीचा आव तेव्हा, त्या वचन देऊ लागती 

म्हणती बोलवा पूजा समयास आम्हा, मदत यथाशक्ती करू

मिळेल जो प्रसाद अंती, सेवन फक्त त्याचे करू

साधून थोर अभिनय शिरकाव केला, कोपऱ्यात त्यांनी दीनवाणी

इतुकाही आमुचा हक्क नोहे म्हणोनी, बसल्या तिथे बापूडवाणी

प्रगटल्या त्या विक्राळ रुपी, दाटून येता निशेची काजळी 

साधली नेमकी संधी त्यांनी, घुसून त्या आल्या राउळी

होता ठेविला नैवेद्य तो, सारा फस्त करुनी टाकला

हाय हे काय झाले, फसलो त्या मायारूपास पुरता

(मूळ बांगला ९० इंग्रजी 33)

नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

190320250409


टिप्पण्या

  1. शिक्षणाचे हिरवे करण झाले तर वक्फ बोर्ड अश्याच प्रकारे कार्य करेल. भtaला दिली ओसरी आणि भt हात पाय पसरी. असेच वासनेचे आहे. ती कधीच तृप्त होत नाही v mhanun aapan janm gheto 200 crore varshe lagtat. Mi ek post nutan Bharat gp var keli ahe jyat rajiv dixit ne england chya dr cHi pol khol keli ahe. Aapan jar dixitche vichar thevle nahit tar pudhe maye madhe nakkifasu. Vel8ch savdh asave v व्हावे

    उत्तर द्याहटवा
  2. वाहवा! सुंदर भावानुवाद.
    उद्देश लक्षत घेतला की गोष्टी सोप्या होतात.
    दंभ राजकीय स्वरूपात येतो तेव्हा गोष्टी अवघड होतात.

    उत्तर द्याहटवा
  3. गोंदवलेकर महाराजांनी वासने बाबत लिहिलंय की जो पर्यंत आपण देवाजवळ वास करतोय (जप करतोय. ) तो पर्यंत वासना आपला कब्जा घेत नाहीत. तो वास थोडा कमी झाला आठवा संपला की लगेच त्या वासना आपल्या मनात शिरकाव करून कब्जा घेतात. शम म्हणजे मनावरचा कंट्रोल आणि दम म्हणजे इंद्रियांवरील कंट्रोल. पण इथे पण देवाचं अधिष्ठान आवश्यक.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक