स्मृतीबनातून बंधमुक्त(पद्य)

Nishar swapon chhutlo re, ei chhutlo re, tutlo bnaadhan tutlo re.

Roilo na aar aaral praane, beriye elem jagot-paane -

Hridoyshatodaler sakol dalguli ei phutlo re, ei phutlo re.

Duwar aamar bhenge sheshe    dnaarale jei aapni ese

Nayonjale bhese hridoy charontale lutlo re.

Aakash hote probhat aalo aamar paane haat baaralo,

Bhaanga kaarar dwaare aamar    jayodhwoni utthlo re, ei uthlo re.


रविंद्रनाथांच्या मूळ बांगला गीतांजलीतल्या ३७ व्या गीताचा मराठी भावानुवाद. 


बंधमुक्त



ओसरले आता स्वप्न निशेचे 

बंध सारे तुटले रे 


जीवा नाही कुठले बंधन

कोश सोडुनी विश्व विचरण 


हृदयाच्या शतदल कमलातुन 

एकेक पाकळी आली उमलून


साक्षात स्वतःहून दिलेस दर्शन

नेत्रदव भिजवी हृदयी श्रावण


तुझ्याच चरणी घाली लोटांगण

स्पर्श आतुर आकाशी किरण


भग्न अशा माझ्या हृदयातून 

उठेल आता जयघोष गर्जून


नितीन सप्रे, ठाणे

nitinnsapre@gmail.com 

090320250510

टिप्पण्या

  1. वाह क्या बात है खूप छान एकतर परमपूज्य रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्यामध्ये जो गहिरेपणाआहे तोच आपण भाषांतरात तंतोतंत उतरविता.न्हवे मला वाटते ती एक स्वतंत्र कविताच आहे. तुमच्या पुढील लेखन कार्यासाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद...नेमकी हीच बाब माझ्या एक अन्य वाचक ताईंनी त्यांच्या काव्यातील डूब भावानुवादात उतरते आहे असं आताच कळवलं आहे.

      हटवा
  2. व्वा वा, फार उत्तम. मस्तच वाचनीय अनुभव 😊🙏👍

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर सर! छान झाला आहे भावानुवाद !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक