स्मृतीबनातून –जलाभिषेक(पद्य)
जलाभिषेक
दाटले नभी कृष्ण घनमेघ
मिरवीत सोन किनारी वर्ख
क्षणात उजळ क्षणात काजळ
आकाशी पाहिला अनोखा खेळ
धावत आला पवन धरेवर
धुळी पर्णांचे रगेल तांडव
सोनसळी चपलेची सळसळ
जलद कडाडा वाजवी पखावज
जलधारा ही जाहली अनावर
घातले टपोर थेंबाचे छुमछुम
बेभान थिरकली तप्त धरणीवर
घडला जलाभिषेक या सृष्टीवर
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
260520251610

योग्य शब्दांत सुंदर मांडणी आणि मान्सूनचं वर्णन
उत्तर द्याहटवाछान!! मस्त कविता
उत्तर द्याहटवा