स्मृतीबनातून – मायारूप (पद्य ११०)


मायारूप


हृदय माझे तव प्रेमाने ओसंडले

कर देवा तुझ्याच मनीचे सारे

असता तू सदा अंतरी नेमाने

घे हरून खुशाल बाह्यांगी सुखे


करुनी नष्ट तहान प्राणाची येथे

पिपासेतून मी मुक्त व्हावे असे

मग मरूभूमीतही तू घेऊनी जावे

तप्त रणात मजसी खुशाल फिरवावे


मायेचा जो खेळ तुझा चाललासे 

सांगतो तुला मला आवडीचा वाटे

व्हावा अश्रूपात तो एक नेत्राने

दुजा ओसंडून वाहे अतीव मोदे 


सर्वस्व ते गमावून बसलो भासे

गवसते दिव्य त्यावेळी अधिक ते

लोटसी दूर तव अंकावरूनी कोठे

उचलून हृदयी घेणार मजसी खासे 


आछे आमार हृदय आछे भरे ११०

https://youtu.be/iFtrrZPD-RE?si=i1-c6jgy400Ryg6G



नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

300520251600






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक