पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून–आ अब लौट चले...

इमेज
आ अब लौट चले... भेडाघाट...मध्यप्रदेशात जबलपूर पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं स्थळ. एकीकडे क्षीरसागराचं उर फुटल्यागत खाली दरीत सतत कोसळणाऱ्या शुभ्र धवल धबधब्याचा निनाद तर दुसरीकडे उंच संगमरवरी खडक रांगांतून पसरलेली सखोल, धीर गंभीर नर्मदा आणि नीरव गूढ शांतता. ‘दुदुची हैय्या’ असं म्हणण्याच्या वयापासून या नितांत सुंदर स्थळी मी जातो आहे. इथलं अन्य आकर्षण म्हणजे नौका विहार आणि त्यात जर नावाडी बोलका आणि रसिक असला, तर मग क्या कहने! इथे चित्रित झालेल्या बॉलिवूडच्या गाण्यांची रसभरीत वर्णनं करताना त्याची रसना थकत नाही. रसिकाग्रणी राज कपूरचं चित्रीकरणासाठीचं हे लाडकं ठिकाण. संथ ठाय लयीतल्या नौकानयना दरम्यान त्याच्या दोन गाण्यांच्या कथा मी नावाड्या कडून ऐकल्या आहेत. पौर्णिमेची रात्र...नर्गिसचा साजूक अवखळ अभिनय...त्याला राजच्या निरागस पण किंचित खोडकर अभिनयाचा प्रतिसाद...प्रेमात स्त्री पुरुषांचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो यावर गीतकार शैलेंद्रनी मुखड्यात नायक नायिकेच्या मुखी केवळ एक शब्द इधर चा उधर करून साधलेली गंमत...आणि शंकर जयकिसनच्या संगीतात मुकेश–लतानी आपल्या सुरेल मधुर सुरांनी आबाद केलेलं आवारात...

स्मृतीबनातून–भाळणे(पद्य)

इमेज
सोनेरी किरणं आणि पाऊस सरींचा खो खो सुरू होता.  चहा पित  खिडकीतून तो  पाहत असताना  अज्ञात कवीची एक हिंदी कविता व्हॉटसअप  वर समोर आली... आणि अंतरात उमटली... भाळणे   रूप शृंगारावर, तुझ्या भाळलो  रंगीत रेशीम, भासांवर भाळलो तू जवळ नाही, तरीही आठवणींवर, तुझ्या भाळलो तूही मला स्मरले असशील त्या क्षणकाळावरी, भाळलो आपुलीच असावी ज्यात कहाणी  शब्ददलांवर त्या, मी भाळलो गंधाळल्या ज्या तुझ्या प्रीतीने मृदुल त्या, भावनांवर भाळलो  स्वप्न असावी भेट आपली, पण स्वप्नील त्या, स्वप्नावर भाळलो नितीन सप्रे 030820251645