स्मृतीबनातून–भाळणे(पद्य)
आणि अंतरात उमटली...
भाळणे
रूप शृंगारावर, तुझ्या भाळलो
रंगीत रेशीम, भासांवर भाळलो
तू जवळ नाही, तरीही
आठवणींवर, तुझ्या भाळलो
तूही मला स्मरले असशील
त्या क्षणकाळावरी, भाळलो
आपुलीच असावी ज्यात कहाणी
शब्ददलांवर त्या, मी भाळलो
गंधाळल्या ज्या तुझ्या प्रीतीने
मृदुल त्या, भावनांवर भाळलो
स्वप्न असावी भेट आपली, पण
स्वप्नील त्या, स्वप्नावर भाळलो
नितीन सप्रे
030820251645
मूळ हिंदी कविता जितकी चांगली तितकीच मराठी काव्य रचना अप्रतीम झालीय.
उत्तर द्याहटवात्यातले भाव यातही तितक्याच उत्कटतेने उतरले आहेत.
मित्रवर्य खूपच छान.
मस्त
उत्तर द्याहटवा