पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून: कंठमती सूर मालिनी

इमेज
‘कंठी कौस्तुभ मणी विराजित’ कंठमती सूर मालिनी : कलाकार नव्हे कलोपासक आजच्या सारखं ग्लॅमरस शाळांचं पेव फुटलं नसतानाच्या काळात, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण मराठी शाळेत जाणारी मुलं साधारणतः प्राथमिक शाळेत असतानाच पाठ करायची आणि पुढे समाजात वावरत असताना त्या म्हणीचा अर्थ नीट समजायला लागायचा. नागपूर, मुंबई, पुणे अशा शहरांत बव्हंशी काळ घालवलेल्या माझ्या आयुष्यात, नुकत्याच संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात क्वचित घडावा असा योगायोग प्रथमच घडून आला. या डिसेंबर महिन्यात(2024) वाराणसी, आग्रा, गोकुळ, वृंदावन आणि खरगोन (मध्यप्रदेश) प्रवासाच्या निमित्तानं, गंगा, यमुना आणि नर्मदा या तीनही पुण्यपावन नद्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. या तीनही नद्यांच्या शांत, विस्तीर्ण पात्रांकडे बघताना मनातील उथळ खळखळाट निवून जाऊन एकप्रकारचा शांतभाव आपोआप उगम पावतो. सेवा निवृत्तीच्या महिन्यात जुळून आलेला हा योग विशेष होता. या पार्श्वभुमीवर नवीन वर्षाची आणि आयुष्याच्या नव्या आवृत्तीची सुरुवात झाली ती भाग्यनगर संस्कृती संमेलनाच्या निमित्तानं हैद्राबाद प्रवासानी.  आता हैद्राबाद हे नाव घेताच चटकन आठवतात ते सलारगं...

स्मृतीबनातून – नाते (पद्य)

इमेज
नाते उलटून मोठा काळ गेला, भेटला कोणी नाही कधी ना पुसली ख्याली खुशाली वा कुठला आरोप नाही  मौनात मी राहिलो जरा, प्रवाही झालो काळा सवे  नात्यात वाटली ओल होती, कोरडी होत गेली स्वये  का काढीशी तू खपल्या पुन्हा जुनाट कोरड्या जखमांवरीच्या परतून अचानक का उगाच, तू पुन्हा येऊ लागला आता न पहिल्या प्रमाणे, हृदयी प्रीत भावना तशी नव्याने आता चेहरा माझा सजणार तो नाही कधी मनात नाही सल आता, मिटले घट्ट ते दरवाजे थाप पडताच न धावते, आता नाते थकून गेले जे नाही विचारता आले, एकांती निवांत भेटीत सारे आता कसे पुसावे तुला, कुठल्या कारणाने गर्दीत यारे नितीन सप्रे 050920251830