स्मृतिबनातून – चहा की कॉफी(पद्य)
चहा की कॉफी
चहा म्हणजे मैत्री
कॉफी म्हणजे प्रेम
चहा मरगळ आल्यावर
कॉफी आठवणीत रमल्यावर
चहा म्हणजे कथासंग्रह...,
कॉफी म्हणजे कादंबरी...!
चहा रात्रंदिन त्रिकाळ
कॉफी धुंद संध्याकाळ
चहा चिंब भिजल्यावर...,
कॉफी ढग दाटुन आल्यावर...!
चहा गप्पा मारत
कॉफी गुजगोष्टी करत
चहा म्हणजे उस्फूर्तता...,
कॉफी म्हणजे उत्कटता...!!
चहा उमेदवारीच्या काळात
कॉफी सिद्ध झाल्यावर
चहा भविष्य घडवताना
कॉफी स्वप्न रंगवताना
नितीन सप्रे
020820251040

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा