निरंजनी स्वर-माणिक पहिली भेट दिनांक,दिवस,महिना आठवत नाही पण ऑक्टोबर १९९१ ते ऑक्टोबर १९९२ या कालावधी दरम्यानची ही घटना. आकाशवाणी भोपाळ मधल्या श्रोता अनुसंधान विभागातली माझ्या पहिल्या नोकरीचा राजीनामा देऊन मी आकाशवाणी मुंबई इथे कार्यक्रम विभागात रुजू झालो होतो. त्या दिवशी सकाळी साडे नऊच्या सुमारास मी नव्या आमदार निवास समोरच्या आकाशवाणी भवनात प्रवेश केला की अलीबाबाच्या गुहेत? असा प्रश्न मला पडला. तिळा तिळा दार उघड न म्हणता अलीबाबाची अफाट संपत्ती असलेली गुहा उघडावी किंवा अल्लादिनचा जादूचा दिवा न घासताही जीन प्रकट व्हावा तशी माझी स्थिती झाली. आत शिरताच सहज म्हणून डावीकडच्या अतिथी कक्षाकडे मान फिरवली. तिथे अगदी सामान्य वेशभूषेत बसलेल्या एका व्यक्ती वर नजर स्थिरावली. त्यांना कुठेतरी पाहिल्या सारखं वाटलं म्हणून मी ही तिथे गेलो. वयाच्या साधारण सहा सात वर्षां पासून आजवर सतत ऐकून मनावर मुद्रित झालेली, ‘अनंता अंत नको पाहू’, ‘अमृताहूनी गोड’, ‘त्या सावळ्या तनुचे’, ‘क्षणभर उघड नयन देवा’, ‘नका विचारू देव कसा’, ‘घन निळा लडिवाळा’, ‘कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम’, ‘विजय पताका श्रीराम...
👌👍
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा