पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून–काव्या(पद्य)

इमेज
  काव्या सुदूर रानी प्रभात होता पुष्पा माजी तेज उजळता  प्रसन्न हा दिन   उगवता अधरी आली गोड कविता मनी हासरी स्वप्ने फुलता ​आशेची ही किरणं सांडता  नभ सोनेरी रंग माखता  अधरी आली गोड कविता ​धुंद वारा सुखद गारवा  मृदुल भाव अंगी शहारा नयनी दिसता प्रेम दुजोरा अधरी आली गोड कविता सान कळ्या उमलूनी येता आसमंत गंधाळून जाता  मन मयूर नृत्य करता अधरी आली गोड कविता ​तिज रूपी ध्येय गवसता, नेणीव ती जाणिवेत येता कवेत येता शब्द स्वरूपा अधरी आली गोड कविता नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  030320261330