स्मृतीबनातून–काव्या(पद्य)

 

सुदूर रानी प्रभात होता

पुष्पा माजी तेज उजळता 

प्रसन्न हा दिन उगवता

अधरी आली गोड कविता


मनी हासरी स्वप्ने फुलता

​आशेची ही किरणं सांडता 

नभ सोनेरी रंग माखता 

अधरी आली गोड कविता


​धुंद वारा सुखद गारवा 

मृदुल भाव अंगी शहारा

नयनी दिसता प्रेम दुजोरा

अधरी आली गोड कविता


सान कळ्या फुलवंती होता

आसमंत गंधाळून जाता 

मन मयूर नृत्य करता

अधरी आली गोड कविता


​तिज रूपी ध्येय गवसता,

नेणीव ती जाणिवेत येता

कवेत येता शब्द स्वरूपा

अधरी आली गोड कविता


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

030320261330

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य