स्मृतीबनातून- अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता

अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता पूर्वपीठिका खरंतर प्रस्तुत लेखाचा विषय हा माझा, अधिकार प्रांत तर नाहीच, अनुभव प्रांतही नाही. एक दिवस, अलीकडे फारच लोकप्रिय झालेल्या 'व्हाट्सअप' विद्यापीठात सकाळी सकाळी प्रवेशता झालो आणि एक निरतिशय सुंदर स्तोत्र ऐकायला मिळाले.. आशयघनता आणि सुरेख अर्थवाही भावपूर्ण गायन यामुळे स्तोत्र मनात खोलवर कुठेतरी रुजून गेले.. साहजिकच त्यादिवशी आणि अजूनही, अनेकदा त्याची पारायणे होतात. प्रथमच स्तोत्र ऐकते वेळी लक्षात आलेला वरवरचा अर्थ, पुनःपुन्हा ऐकल्याने हळूहळू अधिक उलगडत गेला. लक्षात आले की आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्यांची उत्तरे यात दडली आहेत. या तत्वज्ञानाचा संपूर्ण अंगीकार वगैरे जमला नाही, मात्र अंश भर जरी घेता आले, तरीही जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात अमुलाग्र बदल आणण्याची ताकद यात आहे. मनात आले की पुरातन ग्रंथांमध्ये असलेला ज्ञानाचा हा अमूल्य ठेवा, ग्रंथांकडे दुर्लक्षच केल्यामुळे म्हणा किंवा ते काहीतरी जड, कठीण असल्याची भावना करून घेतल्याने म्हणा सर्वजनांच्या कक्षेत सर्व साधारणपणे येत नाही. पण कधी कधी एखा...