स्मृतीबनातून - कुरुभूमी(पद्य)

 नमस्कार….


साहित्य, कला, संस्कृती या विषयांवर आधारित स्मृतीबनातून हा अनियतकालिक ब्लॉग (गद्य) जून 2019 (२५.६.२०१९) ला मी सुरू केला. तेव्हा पासून, आता साधारण चार वर्ष तो अनियमितपणे मात्र सातत्यानं आपणाला सादर करीत आहे. आतापर्यंत 99 लेख प्रकाशित झाले असून साधारणतः ते सर्व विभिन्न वृत्तपत्रं, मासिकं, दिवाळी अंक आणि वेब पोर्टल वरही प्रसिद्ध झाल्यानं माझा उत्साह वाढला आहे. आपणापैकीही बहुतेकांनी नियमित आणि काहींनी साक्षेपी अभिप्राय देऊन मला नेहमीच प्रोत्साहित केलं आहे. त्याची उतराई करूच शकत नाही. माझा तसा मानस ही नाही. 


या काळात हा ब्लॉग वाचलेल्यांची, पाहिलेल्यांची म्हणुया हवंतर, संख्या सुमारे 30 हजारां वर पोहोचली आहे. यात भारता खेरीज 15 हून अधिक देशांतल्या सुमारे अडीच हजार वाचकांचा ही समावेश आहे.  जो माझ्या सारख्या सामान्यजनासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. 


यंदाच्या रामनवमी (३०.०३.२०२३) पासून या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पर्यंत पद्य ही मांडायला सुरुवात केली आहे. त्याचे ही गुणात्मक मूल्यांकन करून अभिप्राय द्याल अशी खात्री आहे.


पुष्प तिसरे


कुरुभूमी


सरत आले आयुष्य तरीही, अद्याप भेटला नाही सखा

मी कोण? कुणाचा काय?, अजूनही उमगले नाही मला 


चालता भेटले वाटेत जे, मानीले मी त्यांना सोबती 

साधून होता स्वार्थ, क्षणी त्याच साथ ते 

सोडती


सहृदयी सख्याचा शोध घेणे, बेकार आहे मी जाणले

लोकहो भेटले वाटेत जे ते, वाट आपुली चालले


उगा मी जीवाचे रान केले, मांडल्या त्यांच्या व्यथा

शोष मज जसा लागला, म्हणाले भांडतो का वृथा?


नसतो कुणी कुणाचा या जगी, मर्म हे मी जाणले

इतिहास साक्षी, कुरुभूमीवर आपुल्यानी आपुल्यांचे रक्त सांडले


नितीन सप्रे, दिल्ली

300323


टिप्पण्या

  1. वा भाई वा।
    क्या बात है
    सोडावा एखाद दूसरा
    बाकी जगी या
    स्वार्थी लोकांचा पसारा.
    नितीनजी वास्तवाचं दर्शन घडविणारी आशयघनकविता.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक