स्मृतीबनातून - कुरुभूमी(पद्य)

 




कुरुभूमी


सरत आले आयुष्य तरीही, अद्याप भेटला नाही सखा

मी कोण? कुणाचा काय?, अजूनही उमगले नाही मला 


चालता भेटले वाटेत जे, मानीले मी त्यांना सोबती 

साधून स्वार्थ होता साथ त्याच क्षणी ते सोडती



सहृदयी सख्याचा शोध घेणे, बेकार आहे मी जाणले

लोकहो भेटले वाटेत जे, ते वाट आपुली चालले


उगा मी जीवाचे रान केले, मांडल्या त्यांच्या व्यथा

शोष मज जसा लागला, म्हणाले भांडतो का वृथा?


नसतो कुणी कुणाचा या जगी, मर्म हे मी जाणले

इतिहास साक्षी, कुरुभूमीवर आपुल्यानीच आपुल्यांचे रक्त सांडले


नितीन सप्रे, दिल्ली

300323


टिप्पण्या

  1. वा भाई वा।
    क्या बात है
    सोडावा एखाद दूसरा
    बाकी जगी या
    स्वार्थी लोकांचा पसारा.
    नितीनजी वास्तवाचं दर्शन घडविणारी आशयघनकविता.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच वास्तववादी कविता ! कोणी नसे कुणाचे हेच सत्य फार नेमकेपणाने मांडले आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य